आरक्षणासाठी दिला खासदारकीचा राजीनामा:म्हणाले- मी समाजासोबत; केंद्रात मराठ्यांची मागणी मांडत का नाही?, आंदोलक आक्रमक
हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राजीनामा दिला. मराठा समाजातील आरक्षणाची मागणी केद्र सरकारच्या दरबारात मांडावी यासाठी काही आंदोलकांनी त्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी आपण मराठा समाजाच्या पाठिशी आहोत, अशी ग्वाही दिली. तर लेटरहेडवर राजीनामा आंदोलकांकडे दिला. तर दोन दिवसाने
गावागावात नेत्यांना बंदी
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरु आहे. मराठा आरक्षणावरून राज्यात वातावरण तापलेले आहे. अनेक गावांमध्ये नेते, मंत्री, आमदार यांना प्रवेश बंदी करण्यात आलीय. जिथे जिथे नेते जातील तिथे मराठा आंदोलक त्यांना विरोध करत आहेत.
आंदोलकांच्या मागणीला प्रतिसाद
दरम्यान, मराठा समाजाच्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी शिंदे गटाच्या खासदारांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे. हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राजीनामा दिला. मराठा समाजातील आरक्षणाच्या मागणी केद्र सरकारच्या दरबारात मांडावी यासाठी काही आंदोलकांनी त्यांची भेट घेतली. यावेळी आंदोलकांनी खासदारकीचा राजीनामा द्या अशी मागणी केली. त्यांच्या या मागणीला तत्काळ प्रतिसाद देत खासदार हेमंत पाटील यांनी लोकसभा अध्यक्ष यांच्या नावे स्वतःच्या लेटर हेडवर राजीनामा लिहून आंदोलकांना दिला.
दोन दिवसानंतर दिल्लीत उपोषण करणार
हिंगोली लोकसभेचे खासदार हेमंत पाटील यांचा ताफा आज हदगावमध्ये अडवण्यात आला. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे आणि जरांगे यांच्या तब्येतीला काही झाले नाही पाहिजे असे आंदोलकांनी हेमंत पाटील यांना सांगितले. त्यावर दोन दिवसांनी मी स्वतः मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी दिल्लीत उपोषणाला बसणार आहे असे हेमंत पाटील यांनी सांगितले.
पाटील पुढे बोलताना म्हणाले की, आपण आजपर्यंत समाज व शेतकऱ्यांचे प्रश्न शासन स्तरावर मांडले आहेत. मराठा आरक्षण चळवळीमध्ये देखील आपण कार्यकर्ता म्हणून सहभाग घेतला आहे. खासदार या नात्याने लोकसभेतही आपण मराठा आरक्षणाचा मुद्दा प्रकर्षाने मांडला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आपण पदाचा राजीनामा देत असल्याचे खासदार हेमंत पाटील यांनी सांगितले.
दरम्यान मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे अशी आपली भूमिका आहे. गावातील तरुणांनी गावामध्ये तसेच जिल्ह्यातील तरुणांनी जिल्ह्याच्या ठिकाणी आंदोलन करावे. लोकसभेमध्ये 23 खासदारांच्या उपस्थितीमध्ये आपण आरक्षणाचा मुद्दा मांडला होता. राज्यात समाजाची स्थिती अतिशय खराब आहे. गड किल्ल्यावर राहणारा समाज आज मोल मजुरी करीत आहे. त्यामुळे समाजाला आरक्षणाची गरज आहे. अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला तसेच राज्यभरात सुरू असलेल्या मराठा समाजाच्या आंदोलनाला आपला पाठिंबा आहे. मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न लक्षात घेऊन आपण पदाचा राजीनामा देत असून लवकरच लोकसभा अध्यक्षांकडे राजीनाम्याचे पत्र पोचवले जाणार असल्याचे खासदार हेमंत पाटील यांनी सांगितले.
सर्वपक्षीय MP-MLAचें एक दिवसांचे उपोषण
सांगलीतील सर्व खासदार, आमदार सोमवारी उपोषण करणार आहेत. मराठा आरक्षण आणि जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी लोकप्रतिनिधी एक दिवसाचं उपोषण करणार आहेत. मराठा आंदोलकांच्या आग्रहानंतर नेत्यांनी हा निर्णय घेतला आहे. सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात कालवा सल्लागार समितीच्या बैठकीनंतर मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी नेत्यांची भेट घेत आरक्षणाबाबत जाब विचारला होता. तसंच जिल्ह्यातील खासदार, आमदारांनी राजीनामा देण्याची मागणी आंदोलकांना केली होती.
मला बोलता येतंय तोपर्यंत चर्चेला या
मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे. मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा चर्चेची तयारी दर्शवलीय. मला बोलता येतंय तोपर्यंत चर्चेला या, नंतर काही उपयोग नाही असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. तर सरकारकडे दोनच पर्याय राहिलेत मराठा समाजाला आरक्षण द्या अन्यथा मराठ्यांशी सामना करा, असा इशाराही मनोज जरांगेंनी दिला.



.jpeg)
About The Author
Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.


Comment List