मुलाला अनुकंपावर घेईना, सरकार मराठा आरक्षण देईना!; वृद्धाने नदीत उडी घेत संपवली जीवनयात्रा, आणखी एकाचा बळी
मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात सर्वत्र तापलेला आहे. तर अनेक युवकांनी आत्महत्या केल्याच्या घटना देखील समोर आल्या. त्यातच पुन्हा एक बळी गेल्याची घटना समोर आली. मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने आणि मुलाला अनुकंपावर नोकरी मिळत नसल्याने नैराश्यातून व्यंकट ढोपरे यांनी वृद्धापकाळात टोकाचे पाऊल उचलून जीवनयात्रा संपवली.
पुण्याच्या आळंदीमधील इंद्रायणी नदीत त्यांचा आज मृतदेह आढळला. नऱ्हे आंबेगाव येथून काल ते दर्शनासाठी आळंदीत आले होते. सकाळी 11 वाजेच्या सुमारास ते तिथून निघाले आणि कुटुंबियांना एक चिट्टी सापडली. त्यातून त्यांनी आरक्षण मिळत नसल्याने टोकाच पाऊल उचलल्याचं स्पष्ट केले होते.
काही लिहिले होते सुसाईड नोटमध्ये
त्यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिलंय की, मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, मी सरपंच असल्यापासून प्रयत्न करतो, तरी सरकार याला गांभीर्याने घेत नाही. तसेच 2012 पासून माझ्या मुलाला अनुकंपावर नोकरी दिली जात नाही. मुलाच्या आईच्या वडिलांच्या जागी त्याला नोकरी मिळावी म्हणून आम्ही प्रयत्न करतोय. पण प्रशासन आम्हाला न्याय देत नाहीत. याच नैराश्यातून मी आत्महत्या करीत आहे.


स्वतःचे हात पाय बांधून नदीत घेतली उडी
ही चिठ्ठी पाहून कुटुंबियांना धक्काच बसला आणि त्यांनी भोसरीत राहणाऱ्या जावयास याबाबत कळवले. तेव्हा आळंदीत त्यांचा शोध घेताना बंधाऱ्यालगत त्यांची पिशवी, मोबाईल, गळ्यातील माळ, चप्पल आणि ज्ञानेश्वरीमधील काही कागद आढळली. त्याच बंधाऱ्यात पोलिस आणि एनडीआरएफकडून शोध सुरू झाला. आज दुपारी तिथंच त्यांचा मृतदेह आढळला. त्यांना पोहायला येत असल्याने त्यांनी स्वतःच स्वतःचे हात बांधून इंद्रायणी नदीत उडी घेतल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. शवविच्छेदन अहवालात यात आणखी स्पष्टता येईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.
हिंगोलीत देखील मराठा आरक्षणासाठी बळी
मराठा आरक्षण मिळत नसल्याने आत्महत्येचं प्रमाण वाढत आहे. त्यातच दोन दिवसांपूर्वी सुसाईड नोट लिहून हिंगोलीत तरुणाने आत्महत्या केली होती. तसेच, आत्महत्या करण्यापूर्वी या तरुणाने 'मी मराठा आरक्षणासाठी जीव देत असल्याचे' सुसाईड नोट लिहून ठेवली होती. कृष्णा कल्याणकर (वय 25 वर्षे) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव होतं.
26 ऑक्टोबरला एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली होती. कृष्णा कल्याणकर या पंचवीस वर्षीय युवकाने मराठा आरक्षणासाठी स्वतःच्या शेतात असलेल्या बाभळीच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली होती. या युवकाकडून एक सुसाईड नोट सुद्धा पोलिसांना मिळाली होती. यामध्ये मराठा आरक्षणामुळे आत्महत्या करत असल्याचे मयत कृष्णा कल्याणकर या युवकाने लिहून ठेवले होतं.
About The Author
Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.


Comment List