दिल्लीतील दोघे मुंबई ओरबडायला निघालेत:नाव न घेता उद्धव ठाकरेंचा मोदी-शहांवर आरोप; म्हणाले- आमची लढाई हुकूमशाहीविरोधात

दिल्लीतील दोघे मुंबई ओरबडायला निघालेत:नाव न घेता उद्धव ठाकरेंचा मोदी-शहांवर आरोप; म्हणाले- आमची लढाई हुकूमशाहीविरोधात

2014 मध्येच भाजप शिवसेनेला संपवायला निघाले होते. काही गद्दार जात आहेत ते पैशाच्या हव्यासापोटी जात आहेत. पण त्यांना समजत नाही की, मुंबई संपविण्यासाठी त्यांचा वापर केला जात आहे. मुंबईला लाचार केले जात आहेत. आपण मोदींविरुद्ध लढत नसून हुकुमशाहीविरोधात लढा देत आहोत, दिल्लीत बसलेले दोघे मुंबईला ओरबडायला निघाले आहेत, असा आरोप करत उद्धव ठाकरेंनी यांनी मोदी-शहांवर निशाणा साधला. ज्येष्ठ शिवसैनिकांच्या मेळाव्यात ते बोलत होते.

आता खोट्याचा कारभार सुरू झाला

2012 पर्यंत मुंबई महापालिका नुकसानीत होती. बिहार ते अहमदाबाद बुलेट ट्रेन का करण्यात येत आहे. मुंबई ओरबडण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन सुरू करण्याचा डाव सुरू झाला. आता खोट्याचा कारभार सुरू झाला आहे, असा टोला उद्धव ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केला.

तू किती लायक, हे सांगणे गरजेचे

तू नालायक आहे असे म्हणणे जितके सोपे असते, तेव्हा तू किती लायक आहे, हे देखील दाखवणे देखील महत्त्वाचे आहे. शरद पवारांवर मोदी यांनी ज्या पद्धतीने टीका केली. तेव्हा आम्ही देखील त्यांना तुम्ही नऊ वर्षांच्या काळात काय केले, असा प्रश्न उपस्थित केला? असा प्रश्न उपस्थित करत उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे मोदींवर निशाणा साधला.

 

जीव वाचवणे ही प्राथमिकता

कोविड काळात जीव वाचवणे ही प्राथमिकता असते. तेव्हा काय केले हे महत्त्वाचे नाही. परंतू कोविड घोटाळा नावाचे षडयंत्र रचून बदनामी करण्याचे काम सुरू आहे. मुंबईत भ्रष्ट्राचार कसा झाला असा खोटा प्रचार करून मुंबई संपविण्याचा कट रचला जात आहे. व आपल्यातील लोकांचा वापर करून घेतला जात आहे, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.

शिवसेना आणि संघर्ष हे नाते कायम

उद्धव ठाकरे म्हणाले की, शिवसेना आणि संघर्ष हे नाते कायम आहे. संघर्षातूनच शिवसेना जन्माला आली आहे. त्यामुळे शिवसेना आणि संघर्ष या एकाच बाजूच्या दोन बाजू आहेत. ज्येष्ठ शिवसैनिकांनी शिवसेना उभी करण्यासाठी कशा पद्धतीने खस्ता खाल्ला, अन काही लोक थेट त्यावर घाला घालू पाहत आहेत.

WhatsApp Image 2023-10-06 at 5.02.42 PM

 

राहुल गांधींची सुवर्ण मंदिरात सेवा-001

 

WhatsApp Image 2023-10-17 at 7.57.39 PM

 

WhatsApp Image 2023-10-17 at 7.57.39 PM(1)

Tags:

About The Author

Maharashtra Janshakti News Picture

Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कागदी पदव्यांपेक्षा स्वतःची क्षमता निर्माण करा- प्रख्यात रंगकर्मी प्रा.दिलीप घारे यांचे युवा कलावंतांना आवाहन- युवक महोत्सवाचा जल्लोषात समारोप   कागदी पदव्यांपेक्षा स्वतःची क्षमता निर्माण करा- प्रख्यात रंगकर्मी प्रा.दिलीप घारे यांचे युवा कलावंतांना आवाहन- युवक महोत्सवाचा जल्लोषात समारोप  
    कळंब,  :  आयुष्याच्या प्रत्येक टप्प्याला समजून घेतले पाहिजे आणि तो मनापासून जगला पाहिजे. अन्यथा पुढे पश्चात्ताप करण्याची वेळ येते.
राज्य शासनातर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर  - डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून चार जणांचा गौरव होणार - प्रा. डॉ.गुलाब खेडकर, डॉ.भारती गवळी यांचा होणार गौरव - प्राचार्य डॉ. भारत खंदारे, प्राचार्य डॉ.विजय भोसले यांचीही निवड
प्रा. यास्मिन शेख आणि चित्रकार श्रीधर अंभोरे यांना श्रद्धांजली सभेचे आयोजन
२३ ऑगस्ट रोजी YCMOUच्या विद्यार्थ्यांशी कुलगुरूंचा संवाद ; राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना मिळणार मार्गदर्शन
बालरंगभूमी परिषदेतर्फे आम्ही नाटक करीत आहोत सादरीकरण संपन्न ; परिषदेचे उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. हसन इनामदार व कोषाध्यक्ष विनोद आघाव यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला
बालरंगभूमी परिषदेच्या स्पर्धेत वयक्तिक गटात वीरा चांदोडकर व गार्गी  मानकर तर सांघिक गटात शारदा मंदिर कन्या शाळा सर्वोत्कृष्ट.
शेवटी झुरळ जिंकले......आंदोलकांचा मोठा विजय ! केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा
Join Us on Whatsapp