उद्यापासून गावागावात आमरण उपोषण:मनोज जरांगेंकडून आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्याची घोषणा, कुणाचा जीव गेल्यास सरकार जबाबदार
मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. अद्याप सरकारने या आंदोलनाची दखल न घेतल्याने मनोज जरांगे यांनी आज आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्याची घोषणा केली. उद्यापासून गावागावात आमरण उपोषण सुरू करा, असे आवाहन मनोज जरांगेंनी मराठा समाजाला केले आहे. तसेच, यादरम्यान कुणाचा जीव गेल्यास सरकार जबाबदार राहील, असा इशारा जरांगेंनी दिला आहे.
· आज पत्रकार परिषदेत सरकारने आमचे आंदोलन गांभीर्याने घ्यावे, असा इशारा मनोज जरांगेंनी दिला. मनोज जरांगे म्हणाले, सरकारने आता गांभीर्याने आंदोलनाची दखल घ्यावी. सरकारने आज संध्याकाळपर्यंत उत्तर द्यावे, असे आवाहनही मनोज जरांगेंनी केले.
· ज्यांना शक्य आहे त्यांनी उद्यापासून आमरण उपोषण करावे, इतरांनी पाणी पिऊन साखळी उपोषण करावे असे आवाहन मनोज जरांगे यांनी केले आहे. या उपोषणादरम्यान कुणाला काही झाल्यास त्याची जबाबदारी राज्य सरकारची असेल अशा इशाराही मनोज जरांगे यांनी दिला. त्यामुळे रविवारपासून राज्यातील वातावरण आणखी तापण्याची चिन्हे आहेत.
· मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारला दिलेली वेळ संपली आहे. त्यानंतर आता जरांगे यांनी आंदोलनाचा दुसरा टप्पा सुरू केला आहे. जालन्यातील आंतरवाली सराटी या ठिकाणी त्यांनी आंदोलन सुरू केले असून आता यापुढे अन्न, पाणीच काय तर उपचारही घेणार नाही असा इशारा त्यांनी दिला आहे. त्यानंतर आता या आंदोलनाचे लोन राज्यभर पसरताना दिसत आहे. याचाच भाग म्हणून राज्यभर आरक्षणासाठी आंदोलन सुरू करण्याचं आवाहन त्यांनी केले आहे.
· मनोज जरांगे म्हणाले, मराठा आरक्षणासाठी सध्या गावागावात साखळी उपोषण सुरू आहे. आता हा लढा आपल्याला आणखी तीव्र करावा लागणार आहे. यासाठी जिथे जिथे साखळी उपोषण सुरू आहे. तिथे तिथे आता आमरण उपोषण सुरू करा.
· सरकारला पुन्हा अल्टीमेटम देताना मनोज जरांगे म्हणाले, उद्यापासून गावागावात आमरण उपोषण सुरू होत आहे. कुणाचे काही बरेवाईट झाल्यास त्याला पूर्ण जबाबदार हे सरकारच राहील. तसेच, या आंदोलनाचीही सरकारने दोन दिवसांत दखल घेतली नाही. तर 31 ऑक्टोबरला आंदोलनाच्या तिसऱ्या टप्प्याची घोषणा करू, असेही मनोज जरांगेंनी जाहीर केले.
· शुक्रवारी सायंकाळी प्रदेश भाजप कार्यालयाकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा 31 सेकंदांचा व्हिडिओ सोशल मीडिया हँडलवर अपलोड करण्यात आला होता. ‘नवमहाराष्ट्राच्या नवनिर्मितीसाठी मी पुन्हा येईन’ असा संदेश त्या पोस्टमधून देण्यात आला. अर्ध्या तासानंतर भाजपने ही पोस्ट डीलिट केली असली तरी या पोस्टमुळे राजकीय वर्तुळात तर्कविर्तकांना उधाण आले. आंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या मनोज जरांगे यांच्या आंदोलनापासून लक्ष हटवण्यासाठी हा विषय मध्येच सुरू करण्यात आला का? असा सवाल आज पत्रकारांनी मनोज जरांगेंना केला. त्यावर मनोज जरांगे म्हणाले, त्यांनी आता कोणतेही विषय टाकले तरी ते मोडूनच पडणार आहे. समाज आता आरक्षणाशिवाय ऐकणार नाही.
· दरम्यान, आरक्षणासाठी मराठा समाज चांगलाच आक्रमक झालेला दिसत आहे. काल नांदेडमध्ये खासदारांची गाडीही फोडण्यात आली. तसेच, यवतमाळमध्येही एसटी पेटवल्याची घटना घडली. यावरुन मनोज जरांगेंनी मराठा समाजाला पुन्हा शांततेचे आवाहन केले. मनोज जरांगे म्हणाले, मराठा समाजाने शांततेत आंदोलन करावे. आंदोलनात कोणत्याही प्रकारची हिंसा नको. तसेच, कुणीही आत्महत्या करू नका. आपल्याला लढून हे आरक्षण मिळवायचे आहे. आपण एकत्र लढू, असे आवाहन मनोज जरांगेंनी केले.
· मनोज जरांगे म्हणाले, महाराष्ट्रातील सर्व आमदार, खासदारांनी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आता एक यावे. या नेत्यांनी आमच्या गावात येऊ नये. तातडीने मुंबईला निघावे. तेथे मराठा आरक्षणासंदर्भात बैठक घ्यावी. विशेष अधिवेशन बोलवावे. मराठा आरक्षणासाठी राज्यातील सर्व नेते पक्षभेद विसरुन एक झाले आहे, असा संदेश दिल्लीत गेला पाहीजे. मराठा आरक्षण मिळाले तर या नेत्यांना आम्ही डोक्यावर घेऊन नाचू.
· मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या तीन दिवसांपासून मनोज जरांगे अन्नपाण्याशिवाय तीव्र उपोषण करत आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती थोडीशी खालावल्याची माहिती आहे. असे असले तरी डॉक्टरांकडून उपचार करुन घेण्यास जरांगेंनी नकार दिला आहे. आता माझ्यावर मराठा आरक्षण हेच उपचार आहे, असे त्यांनी ठणकावून सांगितले आहे.
· दरम्यान, धनगर समाजाने मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा दिला आहे. यशवंत सेनेचे पदाधिकारी अंतरवाली सराटीत जरांगेंच्या भेटीला गेले आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. त्यांनी कोणतेही उपचार घेण्यास नकार दिला आहे.
· मनोज जरांगे यांना राज्यभरातून समर्थन वाढत आहे. आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठा समाजाकडून साखळी उपोषण केले जाणार आहे. जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ हे साखळी उपोषण केले जाणार आहे.
· मराठा आंदोलकांनी केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांना नांदेडमध्ये काळे झेंडे दाखवले. आंदोलकांच्या भीती पोटी प्रशासनाने रात्रीतूनच कार्यक्रमाचे स्थळ बदलले.
अधिवेशन बोलावण्याची मागणी
दरम्यान, सरकारकडून वेळ मागून आरक्षण दिले जात नाही, याचा अर्थ राज्य सरकारचे हे षड्यंत्र असल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. तसेच, सरकारने स्थापन केलेली शिंदे समितीही आता मान्य नसल्याचे सांगत पंजाबराव देशमुखयांनी ज्या आधारावर आरक्षण दिले त्याच धर्तीवर आरक्षण देण्याची मागणीही त्यांनी केली आहे. आरक्षणाचा हा निर्णय घेण्यासाठी सरकारने दोन दिवसांत विधिमंडळ अधिवेशन बोलवावे, अशीही मागणी जरांगेंनी केली आहे. त्यामुळे सरकार या मागण्यांवर आता काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
सरकारला आता नाक राहीले नाही
आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांनी काल पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, शिंदे समितीने सरकारकडे १० हजार पुरावे दिले आहेत. कायदा पारित करून ओबीसीमध्ये समावेशका केला जात नाही? अगोदर पंतप्रधान गोरगरिबांचे वाटत होते, पण आता त्यांना गरिबांची जाणीव राहिली नाही असे वाटत आहे. मराठा समाजाची पोरे मोठे होऊ नयेत असे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे षड्यंत्र आहे. त्यांनीच आरक्षणासाठी वेळ घेतला होता, पण शब्द पाळला नाही. पुरावे असूनही मराठ्यांना आरक्षण दिले जात नाही. सरकारला आता नाक नसल्यासारखे झाले असल्याचे जरांगे पाटील म्हणाले.
समितीला मुदतवाढ मान्य नाही
जरांगे म्हणाले की, १९६७ ला व्यवसाय आधारित आरक्षण दिले गेले. माळी किंवा ओबीसी बांधवांचा व्यवसाय एकचआहे. त्या आधारावर आम्हाला आरक्षण देता येते. त्यांनी दिलेली समितीची मुदतवाढ मान्य नाही. समिती बंद करा म्हटले होते. समितीच्या अहवालाला देखील ३० दिवस दिले होते, समितीला १० वर्षे दिली तरी फायदा नाही. आता समितीच आम्हाला मान्य नसल्याचे जरांगे पाटील म्हणाले.
आत्महत्या नाही, सरकारने केलेले खून
आपण मराठा आरक्षण मिळवणारच आहोत. सरकारच्या छाताडावर बसून ते आरक्षण मिळवू. परंतु,कोणत्याही युवकाने आत्महत्या करू नये. माझीसमाजातील सर्व युवकांना हात जोडून विनंती आहे. मीतुमच्यासाठी लढतो आहे. तुम्हीच नसाल तर हेआरक्षण कुणासाठी घ्यायचे? त्यामुळे कुणीहीआत्महत्या करू नका. या आत्महत्या नसून हत्याआहेत. सरकारने केलेले खून आहेत, असा आरोपमनोज जरांगे पाटील यांनी केला.



.jpeg)
About The Author
Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.


Comment List