जे करणे शक्य नाही त्याचा शब्द कधीच देऊ नये:मराठा आरक्षणावर शरद पवार यांचे स्पष्ट मत; मनोज जरांगेच्या उपोषणाचे केले समर्थन

जे करणे शक्य नाही त्याचा शब्द कधीच देऊ नये:मराठा आरक्षणावर शरद पवार यांचे स्पष्ट मत; मनोज जरांगेच्या उपोषणाचे केले समर्थन

मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून अवघ्या राज्याचे राजकारण तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी या प्रकरणी आपली भूमिका स्पष्ट केली. तसेच सरकारच्या भूमिकेमुळेच मराठा आंदोलनाचा प्रश्न चिघळल्याचा आरोपही केला. जे करणे शक्य नाही त्याचा शब्द केव्हाच देऊ नये. मनोज जरांगे यांनी सरकारला वेळ दिला. पण त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही. आता सरकारने त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे, असे शरद पवार म्हणाले.

शरद पवार यांनी शुक्रवारी पत्रकारांशी संवाद साधला. त्यात त्यांनी मनोज जरांगे यांच्या उपोषणाचे समर्थन करत राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरले. शरद पवार म्हणाले की, मनोज जरांगे पाटलांनी काही मागण्या केल्या आहेत. त्या मागण्यांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांच्याशी सुसंवाद केला. त्यांच्यात प्रत्यक्ष काय बोलणे झाले हे मला माहिती नाही. पण जरांगेंनी सरकारला 30 दिवसांचा वेळ दिल्याचे समजले.

जे करणे शक्य नाही त्याचा शब्द कधी देऊ नये

सरकारने मनोज जरांगे यांना या मुदतीत मराठा समाजाला आरक्षण देण्याचा शब्द दिला होता. पण आता ते आश्वासन पूर्ण झालेले दिसत नाही. जे करणे शक्य नाही त्याचा शब्द कधीच देऊ नये. त्यामुळे आता उपोषण करणाऱ्यांना दोष देता येणार नाही, असे शरद पवार यांनी या प्रकरणी सरकारला धारेवर धरताना स्पष्ट केले.

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला वेळ दिला. पण त्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत. आता सरकारने त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे, असेही शरद पवार यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले.

आता आम्ही थांबणार नाही

दुसरीकडे, मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारला दिलेली 40 दिवसांची मुदत संपल्यामुळे मनोज जरंगे यांनी जालन्याच्या आंतरवाली सराटीत बुधवारपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. सरकारने आम्हाला 30 दिवसांची मुदत मागितली. पण आम्ही 40 दिवस दिले. आता आम्ही थांबणार नाही, असे जरांगे यांनी या प्रकरणी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री शिंदेंवर कुणाचातरी दबाव

यावेळी त्यांनी सरकारवर आपल्याविरोधात काही जणांची माथी भडकवण्याचा आरोपही केला. मराठा समाजाच्या न्याय्य मागण्यांवरून सरकार काही व्यक्तींना माझ्याविरोधात भडकवत आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यात येऊ नये यासाठी कुणीतरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर दबाव आणत आहे, असेही ते यावेळी बोलताना म्हणाले.

राहुल गांधींची सुवर्ण मंदिरात सेवा-001

WhatsApp Image 2023-10-06 at 5.02.42 PM

gunratn-sadavarte-sanjay-gaikwad34_2023101111173

Tags:

About The Author

Maharashtra Janshakti News Picture

Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कागदी पदव्यांपेक्षा स्वतःची क्षमता निर्माण करा- प्रख्यात रंगकर्मी प्रा.दिलीप घारे यांचे युवा कलावंतांना आवाहन- युवक महोत्सवाचा जल्लोषात समारोप   कागदी पदव्यांपेक्षा स्वतःची क्षमता निर्माण करा- प्रख्यात रंगकर्मी प्रा.दिलीप घारे यांचे युवा कलावंतांना आवाहन- युवक महोत्सवाचा जल्लोषात समारोप  
    कळंब,  :  आयुष्याच्या प्रत्येक टप्प्याला समजून घेतले पाहिजे आणि तो मनापासून जगला पाहिजे. अन्यथा पुढे पश्चात्ताप करण्याची वेळ येते.
राज्य शासनातर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर  - डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून चार जणांचा गौरव होणार - प्रा. डॉ.गुलाब खेडकर, डॉ.भारती गवळी यांचा होणार गौरव - प्राचार्य डॉ. भारत खंदारे, प्राचार्य डॉ.विजय भोसले यांचीही निवड
प्रा. यास्मिन शेख आणि चित्रकार श्रीधर अंभोरे यांना श्रद्धांजली सभेचे आयोजन
२३ ऑगस्ट रोजी YCMOUच्या विद्यार्थ्यांशी कुलगुरूंचा संवाद ; राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना मिळणार मार्गदर्शन
बालरंगभूमी परिषदेतर्फे आम्ही नाटक करीत आहोत सादरीकरण संपन्न ; परिषदेचे उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. हसन इनामदार व कोषाध्यक्ष विनोद आघाव यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला
बालरंगभूमी परिषदेच्या स्पर्धेत वयक्तिक गटात वीरा चांदोडकर व गार्गी  मानकर तर सांघिक गटात शारदा मंदिर कन्या शाळा सर्वोत्कृष्ट.
शेवटी झुरळ जिंकले......आंदोलकांचा मोठा विजय ! केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा
Join Us on Whatsapp