...तर महाराष्ट्रात मोदींचे विमान उतरु दिले नसते: मराठा समाजात तेव्हडी ताकत आहे, मनोज जरांगेंचा थेट हल्लाबोल; म्हणाले- आरक्षण द्यायचे नसेल तर महाराष्ट्रात येता कशाला?

...तर महाराष्ट्रात मोदींचे विमान उतरु दिले नसते: मराठा समाजात तेव्हडी ताकत आहे, मनोज जरांगेंचा थेट हल्लाबोल; म्हणाले- आरक्षण द्यायचे नसेल तर महाराष्ट्रात येता कशाला?

मनात वाईट विचार असता तर काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विमानच काल शिर्डीत उतरू दिले नसते. मोदी मराठा आरक्षणावर बोलणार नाही हे जर माहित असते तर त्यांना महाराष्ट्रात येऊ दिले नसते, एवढी ताकद मराठा समाजात आहे, अशा शब्दांत आज मनोज जरांगे पाटील यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला.

मोदींना शिर्डीत येऊ दिले

मराठा आरक्षणासाठी गेल्या दोन दिवसांपासून मनोज जरांगेंचे उपोषण सुरू आहे. आज पत्रकार परिषदेत मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंनी आणखी आक्रमक भूमिका घेतली. मराठा आरक्षणावर मोदी बोलले नाहीत, यावर तीव्र नाराजी व्यक्त करत मनोज जरांगे म्हणाले, मराठा नेत्यांनी समाजाची फसवणूक केली म्हणून आम्ही त्यांना गावबंदी केली आहे. तरीही आम्ही मोदींना शिर्डीत येऊ दिले.

मोदी बोलतील अशी आशा होती

मनोज जरांगे म्हणाले, मोदी महाराष्ट्रात येऊन मराठा आरक्षणावर बोलतील अशी आमची अपेक्षा होती. अवघ्या देशात मराठा आरक्षणासाठी जे आंदोलन सुरू आहे, त्याची दखल घेतली जात आहे. तरीही मोदी काल मराठा आरक्षणावर का बोलले नाहीत. यावर दोनच शक्यता आहे. एक तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दिल्लीला गेले तेव्हा त्यांनी मोदींना आरक्षणाबाबत सांगितलेच नसेल, अशी आम्हाला शंका आहे.

मोदींबद्दल चुकीची समज होती

मनोज जरांगे म्हणाले, दुसरी शंका आम्हाला अशी आहे की कदाचित मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी मोदींना मराठा आरक्षणाबाबत सांगितले असेल, तरीही मोदी जाणूनबुजून मराठा आरक्षणावर बोलले नसतील. याचा स्पष्ट अर्थ आहे की, मोदींना आता गोरगरीब मराठा समाजाची गरज नाही. मोदींबद्दल माझे जे काही विचार होते ते चुकीचे होते. पण, मोदींच्या न बोलन्याने आम्लाहा आरक्षण मिळणे काही थांबणार नाही. कोणत्याही स्थितीत आम्ही आरक्षण मिळवूनच राहू.

तरुणांना भडकावण्यासाठी गावात येता का?

मराठा आरक्षणासाठी नेत्यांना गावबंदी असतानाही गावात आलेल्या खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या ताफ्यातील वाहनांची रात्री तोडफोड करण्यात आली आहे. नांदेडच्या कंधार तालुक्यातील अंबुलगा गावात रात्री उशिरा ही घटना घडली. यावर मराठा आरक्षण द्यायचे नसेल तर आमच्या गावात येताच कशाला?, असा सवाल जरांगेंनी केला. मनोज जरांगे म्हणाले, नेत्यांचे आता गावात काय काम आहे? आम्ही तुमच्या घरासमोर येत नाही. मग तुम्ही आमच्या घरात का येता? मराठा तरुणांना भडकावण्यासाठी गावात येता का? आपल्या घरी बसून भाकरी खा ना.

फुकटच्या भाकरी खायला येऊ नका

तसेच, महाराष्ट्रातील सर्व आमदारांनी, खासदारांनी, नेत्यांनी यापुढे गावात न जाता सरळ विधानसभेत जावे व तिथे मराठा आरक्षणाचा कायदा पास करावा. यासाठी सरकारने दोन दिवसांत विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणीही जरांगेंनी केली. नेत्यांचे काम विधानसभेत आहे. आमच्या गावात, घरी फुकटच्या भाकरी खायला येऊ नका, असे मनोज जरांगे म्हणाले.

मनोज जरांगेंच्या उपोषणाचा तिसरा दिवस: डॉक्टरांकडून तपासणी करुन घेण्यासही नकार

मराठा आरक्षणासाठी आंतरवाली ‎सराटी येथे मनोज जरांगे पाटलांचे ‎उपोषण सुरू आहे. आज शुक्रवारी या ‎उपोषणाचा तिसरा दिवस आहे. उपोषणाच्या पहिल्या दिवशी ‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎संभाजीराजे छत्रपती यांच्या विनंतीचा ‎मान ठेऊन मनोज जरांगेंनी पाणी घेतले होते. ‎मात्र, आता जोपर्यंत आरक्षण मिळत‎नाही तोपर्यंत उपचार, सलाईन, पाणी ‎न घेता कठोर उपोषण करणार‎ असल्याचे जरांगे पाटील म्हणाले. ‎मराठा आरक्षण हाच माझा उपचार ‎असल्याचे जरांगे यांनी पुन्हा सांगितले.‎ 

राहुल गांधींची सुवर्ण मंदिरात सेवा-001

WhatsApp Image 2023-10-06 at 5.02.42 PM

gunratn-sadavarte-sanjay-gaikwad34_2023101111173

Tags:

About The Author

Maharashtra Janshakti News Picture

Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कागदी पदव्यांपेक्षा स्वतःची क्षमता निर्माण करा- प्रख्यात रंगकर्मी प्रा.दिलीप घारे यांचे युवा कलावंतांना आवाहन- युवक महोत्सवाचा जल्लोषात समारोप   कागदी पदव्यांपेक्षा स्वतःची क्षमता निर्माण करा- प्रख्यात रंगकर्मी प्रा.दिलीप घारे यांचे युवा कलावंतांना आवाहन- युवक महोत्सवाचा जल्लोषात समारोप  
    कळंब,  :  आयुष्याच्या प्रत्येक टप्प्याला समजून घेतले पाहिजे आणि तो मनापासून जगला पाहिजे. अन्यथा पुढे पश्चात्ताप करण्याची वेळ येते.
राज्य शासनातर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर  - डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून चार जणांचा गौरव होणार - प्रा. डॉ.गुलाब खेडकर, डॉ.भारती गवळी यांचा होणार गौरव - प्राचार्य डॉ. भारत खंदारे, प्राचार्य डॉ.विजय भोसले यांचीही निवड
प्रा. यास्मिन शेख आणि चित्रकार श्रीधर अंभोरे यांना श्रद्धांजली सभेचे आयोजन
२३ ऑगस्ट रोजी YCMOUच्या विद्यार्थ्यांशी कुलगुरूंचा संवाद ; राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना मिळणार मार्गदर्शन
बालरंगभूमी परिषदेतर्फे आम्ही नाटक करीत आहोत सादरीकरण संपन्न ; परिषदेचे उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. हसन इनामदार व कोषाध्यक्ष विनोद आघाव यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला
बालरंगभूमी परिषदेच्या स्पर्धेत वयक्तिक गटात वीरा चांदोडकर व गार्गी  मानकर तर सांघिक गटात शारदा मंदिर कन्या शाळा सर्वोत्कृष्ट.
शेवटी झुरळ जिंकले......आंदोलकांचा मोठा विजय ! केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा
Join Us on Whatsapp