गाड्या फोडून उपयोग नाही, गुणरत्न सदावर्तेंनाच संपवायला पाहिजे होते; शिंदे गटाच्या आमदारचे प्रक्षोभक विधान; आरक्षणाचा मुद्दा आणखी तापणार

गाड्या फोडून उपयोग नाही, गुणरत्न सदावर्तेंनाच संपवायला पाहिजे होते; शिंदे गटाच्या आमदारचे  प्रक्षोभक विधान; आरक्षणाचा मुद्दा आणखी तापणार

गुणरत्न सदावर्ते यांच्या गाड्यांची तोडफोड करणाऱ्या मराठा आंदोलकांनी सदावर्ते यांना संपवायला पाहिजे होते, असे प्रक्षोभक विधान शिवसेनेच्या सत्ताधारी शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केली आहे.

मराठा आरक्षझणासाठी मनोज जरांगे पाटील जालन्याच्या आंतरवाली सराटीत आमरण उपोषणाला बसले आहेत. या उपोषणामुळे अवघ्या राज्याचे राजकारण तापले आहे. या आंदोलनावर सरकार दरबारी विविध उपाययोजना केल्या जात असताना मुंबईत वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या गाड्यांची तोडफोड करण्याची घटना घडली आहे. या पार्श्वभूमीवर संजय गायकवाड यांनी गुणरत्न सदावर्ते यांना संपवण्याची भाषा केली आहे.

काय म्हणाले संजय गायकवाड?

गुणरत्न सदावर्ते यांच्या नालायकपणामुळेच महाराष्ट्रातील गोरगरीब मराठ्यांच्या तोंडातील आरक्षणाचा घास हिरावला गेला. त्यांनी मराठा आरक्षणाविरोधात प्रखरतेने कोर्टात बाजू मांडली. तेव्हा ते सूडाने पेटले होते. जसे काही मराठा आरक्षणामुळे त्यांचे फार मोठे नुकसान होणार होते. त्यामुळे त्यांना गाड्यांची तोडफोड करण्याची शिक्षा कमी आहे. त्याला संपवायलाच हवे होते, असे आमदार संजय गायकवाड यांनी म्हटले आहे.

गुणरत्न सदावर्ते यांना संपवण्यात आले असते तर मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला असता. हे ज्यांनी कुणी केले त्यांना माझे सांगणे आहे की, हे फार कमी झाले. त्यांची व्यवस्था आणखी चांगले करण्याची गरज होती, असेही संजय गायकवाड यावेळी म्हणाले. त्यांच्या या विधानामुळे सध्याच्या वादात आणखी भर पडली आहे.

सदावर्तेंच्या गाड्यांवर सकाळी झाला होता हल्ला?

मुंबईतील क्रिस्टल टॉवरमध्ये गुणरत्न सदावर्ते यांचे घर आहे. या इमारतीबाहेर सदावर्ते यांच्या गाड्या लावण्यात आल्या होत्या. या गाड्यांची गुरुवारी सकाळी मराठा आंदोलकांनी तोडफोड केली. यावेळी घटनास्थळी पोलिसांचीही उपस्थिती होती. आंदोलकांनी गाड्यांची तोडफोड करताना 'एक मराठा लाख मराठा' अशी नारेबाजी केली. त्यानंतर पोलिसांनी या आंदोलकांना ताब्यात घेतले.

गुणरत्न सदावर्ते यांची जरांगेंवर टीका

या घटनेनंतर गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे यांच्यावर तुफान हल्ला चढवत त्यांच्या अटकेची मागणी केली. हल्लेखोरांना व मनोज जरांगेंना माझा प्रश्न आहे की, तुमच्या शांततामय आंदोलनाची हीच व्याख्या आहे का? मला गप्प केले जाऊ शकत नाही. माझा लढा या देशातील 50 टक्के खुल्या जागा वाचवण्यासाठी आहे. या देशाला जातीपातीत तोडले जाऊ नये यासाठी माझा लढा आहे.

हल्लेखोरांनी माझ्या कष्टाच्या कमाईचे नुकसान केले. त्यांनी यापूर्वी 32 कर्मचाऱ्यांना विनाकारण मारहाण केली. त्यानंतर पोलिस अधिकाऱ्यांवर कारण नसताना कारवाई करण्यात आली. मला अनेक प्रकारच्या धमक्या दिल्या गेल्या, असे सदावर्ते म्हणाले.

माझी मुलगी झेन मागील ८ दिवसांपासून शाळेत जात नाही. कारण झेन व जयश्री पाटील यांना मारण्याच्या व उचलून नेण्याच्या धमक्या देण्यात येत आहेत. सामान्यांच्या 50 टक्के जागा वाचवत असल्याने आम्हाला त्रास दिला जात आहे, असे सदावर्ते म्हणाले.

राहुल गांधींची सुवर्ण मंदिरात सेवा-001

WhatsApp Image 2023-10-06 at 5.02.42 PM

IMG-20230903-WA0117

Tags:

About The Author

Maharashtra Janshakti News Picture

Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कागदी पदव्यांपेक्षा स्वतःची क्षमता निर्माण करा- प्रख्यात रंगकर्मी प्रा.दिलीप घारे यांचे युवा कलावंतांना आवाहन- युवक महोत्सवाचा जल्लोषात समारोप   कागदी पदव्यांपेक्षा स्वतःची क्षमता निर्माण करा- प्रख्यात रंगकर्मी प्रा.दिलीप घारे यांचे युवा कलावंतांना आवाहन- युवक महोत्सवाचा जल्लोषात समारोप  
    कळंब,  :  आयुष्याच्या प्रत्येक टप्प्याला समजून घेतले पाहिजे आणि तो मनापासून जगला पाहिजे. अन्यथा पुढे पश्चात्ताप करण्याची वेळ येते.
राज्य शासनातर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर  - डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून चार जणांचा गौरव होणार - प्रा. डॉ.गुलाब खेडकर, डॉ.भारती गवळी यांचा होणार गौरव - प्राचार्य डॉ. भारत खंदारे, प्राचार्य डॉ.विजय भोसले यांचीही निवड
प्रा. यास्मिन शेख आणि चित्रकार श्रीधर अंभोरे यांना श्रद्धांजली सभेचे आयोजन
२३ ऑगस्ट रोजी YCMOUच्या विद्यार्थ्यांशी कुलगुरूंचा संवाद ; राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना मिळणार मार्गदर्शन
बालरंगभूमी परिषदेतर्फे आम्ही नाटक करीत आहोत सादरीकरण संपन्न ; परिषदेचे उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. हसन इनामदार व कोषाध्यक्ष विनोद आघाव यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला
बालरंगभूमी परिषदेच्या स्पर्धेत वयक्तिक गटात वीरा चांदोडकर व गार्गी  मानकर तर सांघिक गटात शारदा मंदिर कन्या शाळा सर्वोत्कृष्ट.
शेवटी झुरळ जिंकले......आंदोलकांचा मोठा विजय ! केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा
Join Us on Whatsapp