मुख्यमंत्री शिंदेंच्या शिवरायांच्या शपथेवर राऊतांचा तिखट हल्ला:म्हणाले - रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत शिवसेनेत राहणार होते, राहिले का?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावर दसरा मेळाव्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या घेतलेल्या शपथेवर शिवसेनेच्या ठाकरे गटाने बोचरी टीका केली आहे. एकनाथ शिंदे रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत शिवसेनेत राहणार होते, पण राहिले का? अशा शब्दांत ठाकरे गटाने त्यांच्या शपथेवर सवाल उपस्थित केला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आझाद मैदानावरील आपल्या दसरा मेळाव्यात छत्रपती शिवाजी महाराज यांची शपथ घेऊन मराठा समाजाला आरक्षण देण्याची कटिबद्धता व्यक्त केली होती. त्यांच्या या टीकेवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे.
संजय राऊत म्हणाले की, सध्या भाजपच्या सहवासात आल्यापासून खोट्या शपथ घेण्याचे प्रमाण वाढले आहे. 2014 पासून राजकारण शिवरायांचे नाव वापरण्याची पद्धत सुरू झाली. तुम्ही शपथा घेऊन बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करता. शिवरायांच्या महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसता. मराठी माणसांच्या भक्कम एकजुटीला तडे देता. हे सर्वकाही भाजपच्या इशाऱ्यानुसार सुरू आहे. त्यामुळे त्यांच्या शपथेकडे लक्ष देण्याची गरज नाही.
शिंदेंना आचार-विचार नाही
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना स्वतःचा आचार - विचार भूमिका काहीच नाही. भाजप सांगेल तेच काम हे करत आहेत. काही दिवसांनी हे डोक्यावरती काळी टोपी घालून फिरतील. रक्ताचा शेवटचा थेंब व श्वास असेपर्यंत ते शिवसेनेत राहणार होते, पण आता राहिलेत का?, असे संजय राऊत म्हणाले.
आमच्या मनात आग पेटली आहे
सध्या महाराष्ट्राची नाहक बदनामी केली जात आहे. महाराष्ट्राच्या छातीवर बेकायदा सराकर बसवून या मराठ्यांची बदनामी केली जात आहे. त्यामुळे आमच्या मनात आग पेटलेली आहे. यामुळेच आमचा जळफळाट होत आहे, असे संजय राऊत म्हणाले.
शिमगा हिंदू सण नाही का?
शिंदे गटाने आमच्या मेळावा शिमगा मेळावा असल्याची टीका केली. मग शिमगा हिंदू सण नाही का? शिमगा हा महाराष्ट्रातील सण आहे. उत्सवाचा मोठा भाग आहे. तुम्हाला तो नको आहे का? होळी, दिवाळी. संघ परिवाराने आता काही नवे सण आणलेत. ते तुम्ही महाराष्ट्रात सुरू करणार आहेत का? असेही राऊत यावेळी म्हणाले.
पालघर हत्याकांड म्हणजे उद्धव ठाकरेंच्या बदनामीचा कट
संजय राऊत यांनी यावेळी महाराष्ट्रात शिंदे-भाजप सरकार आल्यानंतर हत्याकांड झाले नाही का? असा सवालही उपस्थित केला. पालघरचे हत्याकांड म्हणजे उद्धव ठाकरे यांना बदनाम करण्यासाठीचा कट होता. या घटनेनंतरही अनेक साधूंवर हल्ले झाले. हत्याकांडं घडली. त्यावर तुम्ही का बोलत नाही. तुमची दातखिळी बसली का? असे संजय राऊत एकनाथ शिंदे व भाजपवर हल्ला चढवत म्हणाले.



.jpeg)
About The Author
Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.


Comment List