राणेंनी 96 कुळी मराठ्यांच्या स्वाभिमानाला हात घातला:2024 मध्ये मराठा काय हे दाखवून देऊ, मनोज जरांगे यांचा तिखट पलटवार

राणेंनी 96 कुळी मराठ्यांच्या स्वाभिमानाला हात घातला:2024 मध्ये मराठा काय हे दाखवून देऊ, मनोज जरांगे यांचा तिखट पलटवार

कोणताही 96 कुळी मराठा कुणबी प्रमाणपत्र घेणार नाही असा दावा करणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर मराठा आरक्षणासाठी रान पेटवणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी तिखट हल्ला चढवला आहे. राज्यातील गोरगरीब मराठा बांधवांच्या तोंडाशी आरक्षणाचा घास आला आहे. त्यामुळे मराठा नेत्यांनी भावनाशू्न्य वागू नये. त्यांच्या अन्नात माती कालवण्याचे पातक करू नये, असे जरांगे यांनी राणेंना उद्देशून म्हटले आहे.

नारायण राणेंचा आताच विरोध का?

मनोज जरांगे यांनी शुक्रवारी शिवनेरी किल्ल्यावर पत्रकारांशी संवाद साधला. त्यात त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावर आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार केला. ते म्हणाले की, काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात नारायण राणे यांच्या 1 सदस्यीय समितीने मराठा आरक्षणाचा अहवाल तयार केला होता. हा अहवाल आजवरच्या मराठा आरक्षणाच्या लढ्यात प्रमाण मानला गेला. पण आता जरांगेंनी मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी केल्यानंतर नारायण राणे यांनी त्याला विरोध केला, असे ते म्हणाले.

मराठा समाज काय हे दाखवून देऊ

कुठलाच 96 कुळी मराठा कुणबी दाखला घेणार नाही, अशी ठाम भूमिका नारायण राणे यांनी गुरुवारी व्यक्त केली. त्यावर जरांगे बोलत होते. ते पुढे म्हणाले की, राज्य सरकार 100 टक्के मराठा समाजाविरोधात उठले आहे. आम्ही 2024 पर्यंत शांत राहू. सरकार कुणाला पुढे करते ते पाहू. त्यानंतर 2024 मध्ये मराठा समाज काय आहे हे त्यांना दाखवून देऊ.

सरकारला शांततेचे युद्ध पेलणार नाही

सामान्य मराठ्यांत फूट पाडणे सोपे नाही. सरकारने सामान्य शेतकऱ्यांना डिवचू नये. शांत रहावे. ठराविक मुदतीत आरक्षण द्यावे. आमचा अंत पाहू नका. आम्ही मराठा बांधवांचे बलिदान वाया जाऊ देणार नाही. सरकारने मराठ्यांचे बळी घेऊ नयेत. ते सरकारला फार महागात पडेल, असा इशाराही जरांगे यांनी यावेळी शिंदे सरकारला दिला. येत्या 24 तारखेपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही, तर पुन्हा एकदा शांततेच्या मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल. पण हे शांततेचे युद्ध सरकारला पेलणार नाही, असेही ते यावेळी ठामपणे म्हणाले.

कुणबी नावाने आरक्षण घेणे वाईट नाही

राज्याच्या सर्वच मराठा बांधव आरक्षणाची मागणी करत आहेत. कुणबी नावाने आरक्षण घेण्यात काहीही वाईट नाही. कुणबी म्हणजे शेती करणारा. आमचे बापजादे शेती करायचे. श्रीमंत मराठाही शेती करायचे. त्यांना कुणबी म्हणून ओळखले जाते. मराठा समाजाला क्षत्रिय व कुणबी अशी 2 अंग आहेत. त्यामुळे कुणबी या शब्दाशी नाते तोडता येणार नाही, असेही मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी नारायण राणे यांच्यावर निशाणा साधताना स्पष्ट केले.

राहुल गांधींची सुवर्ण मंदिरात सेवा-001

WhatsApp Image 2023-10-06 at 5.02.42 PM

IMG-20230903-WA0117

Tags:

About The Author

Maharashtra Janshakti News Picture

Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कागदी पदव्यांपेक्षा स्वतःची क्षमता निर्माण करा- प्रख्यात रंगकर्मी प्रा.दिलीप घारे यांचे युवा कलावंतांना आवाहन- युवक महोत्सवाचा जल्लोषात समारोप   कागदी पदव्यांपेक्षा स्वतःची क्षमता निर्माण करा- प्रख्यात रंगकर्मी प्रा.दिलीप घारे यांचे युवा कलावंतांना आवाहन- युवक महोत्सवाचा जल्लोषात समारोप  
    कळंब,  :  आयुष्याच्या प्रत्येक टप्प्याला समजून घेतले पाहिजे आणि तो मनापासून जगला पाहिजे. अन्यथा पुढे पश्चात्ताप करण्याची वेळ येते.
राज्य शासनातर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर  - डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून चार जणांचा गौरव होणार - प्रा. डॉ.गुलाब खेडकर, डॉ.भारती गवळी यांचा होणार गौरव - प्राचार्य डॉ. भारत खंदारे, प्राचार्य डॉ.विजय भोसले यांचीही निवड
प्रा. यास्मिन शेख आणि चित्रकार श्रीधर अंभोरे यांना श्रद्धांजली सभेचे आयोजन
२३ ऑगस्ट रोजी YCMOUच्या विद्यार्थ्यांशी कुलगुरूंचा संवाद ; राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना मिळणार मार्गदर्शन
बालरंगभूमी परिषदेतर्फे आम्ही नाटक करीत आहोत सादरीकरण संपन्न ; परिषदेचे उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. हसन इनामदार व कोषाध्यक्ष विनोद आघाव यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला
बालरंगभूमी परिषदेच्या स्पर्धेत वयक्तिक गटात वीरा चांदोडकर व गार्गी  मानकर तर सांघिक गटात शारदा मंदिर कन्या शाळा सर्वोत्कृष्ट.
शेवटी झुरळ जिंकले......आंदोलकांचा मोठा विजय ! केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा
Join Us on Whatsapp