शरद पवार सुप्रिया सुळेंना हमासविरोधात लढण्यासाठी गाझाला पाठवतील:आसामचे CM हिमंता बिस्वा सरमा यांचे वादग्रस्त विधान

शरद पवार सुप्रिया सुळेंना हमासविरोधात लढण्यासाठी गाझाला पाठवतील:आसामचे CM हिमंता बिस्वा सरमा यांचे वादग्रस्त विधान

मुंबई इस्त्रायल व हमास अतिरेकी संघटनेतील युद्ध आता टोकाला पोहोचले आहे. या युद्धावरून भारतात आरोप प्रत्यारोप रंगले असताना आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी शरद पवार व त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले आहे. सद्यस्थिती पाहता शरद पवार हमासविरोधात लढण्यासाठी गाझाला पाठवतील, असे ते म्हणालेत.

काय म्हणाले होते शरद पवार?

शरद पवार यांनी नुकतेच एका कार्यक्रमात बोलताना पॅलेस्टिनी जनतेची बाजू घेतली होती. ते म्हणाले होते की, सध्या युद्ध सुरू असलेली जमीन मुळात पॅलेस्टिनी लोकांची आहे. तिथे अतिक्रमण झाले आणि इस्रायल हा देश उदयाला आला. मला त्याच्या खोलात जायचे नाही. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांच्यापासून अटलबिहारी वाजपेयींपर्यंत सर्वांनी पॅलेस्टाईनला मदत करण्याची भूमिका घेतली होती. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याऊलट भूमिका घेत इस्त्रायलची बाजू घेतील. जमिनीचे मूळ मालक असलेल्या पॅलेस्टाईनकडे त्यांनी दुर्लक्ष केले.

काय म्हणाले हिमंता सरमा?

शरद पवार यांच्या या विधानानंतर भाजपने त्यांच्यावर टीकेची झोड उठवली. मध्यपूर्वेतील या संघर्षाविषयी पत्रकारांनी बुधवारी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांना छेडले असता त्यांनी पवारांना टोला हाणला. मला वाटते की शरद पवार हमासच्या अतिरेक्यांविरोधात लढण्यासाठी सुप्रिया सुळेंना गाझा सीमेवर पाठवतील, असे ते म्हणाले.

विनोद तावडेंचाही निशाणा

तत्पूर्वी विनोद तावडे यांनी यांनीही या प्रकरणी शरद पवारांवर निशाणा साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्रायलच्या पाठीशी उभे राहिलेत. त्यावर शरद पवारांनी टीका केली आहे. त्यांनी हे लक्षात घ्यायला हवे की, सध्या जगात दहशतवाद व दहशतवादविरोधी राष्ट्रांमध्ये युद्ध सुरू आहे. त्यामुळे अतिरेकी देशाविरोधात उभे राहून इस्रायलला पाठींबा देणे क्रमप्राप्तच आहे, असे तावडे म्हणाले.

मुंबईत झालेले बॉम्बस्फोट, 26/11 चा अतिरेकी हल्ला आदी घटनांत किती बळी गेले हे शरद पवार यांनी आठवावे. एवढे बळी गेले असतानाही ते दहशतवादी देशांच्या पाठीशी का उभे राहत आहेत? हे सर्व मतांच्या राजकारणासाठी सुरू आहे की, त्यामागे आणखी काही कारण आहे, हे जनतेला माहिती आहे, असेही विनोद तावडे यावेळी पवारांवर निशाणा साधताना म्हणाले.

फडणवीस यांनीही साधला निशाणा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणी पवारांवर टीका केली. इस्रायल - पॅलेस्टाईन वादात भारताने आपली भूमिका कधीच बदलली नाही. पण त्याचवेळी भारताने दहशतवाद, मग तो कुठल्याही स्वरुपात व कुणाच्याही विरोधात असो, त्याला कायमच कडाडून विरोध केला. इस्त्रायलमध्ये निष्पाप लोक मारले गेले, तेव्हा संपूर्ण जगाने त्याचा निषेध केला. तसाच निषेध भारतानेही केला. शरद पवार यांनीही तेच करायला हवे. कारण, दहशतवादी हल्ल्याच्या यातना मुंबईने अधिक सोसल्या आहेत. विशेषत: 26/11 च्या हल्ल्यावेळी मुंबईने अनेक नागरिक गमावले. माझी शरद पवार यांना विनंती आहे की, केवळ मतांच्या राजकारणाचा विचार करु नका, तर दहशतवादाचा तीव्र शब्दात धिक्कार करा, असे देवेंद्र फडणवीस यांनी एका ट्विटमध्ये म्हटले आहे.

WhatsApp Image 2023-10-06 at 5.02.42 PM

 

राहुल गांधींची सुवर्ण मंदिरात सेवा-001

 

WhatsApp Image 2023-10-17 at 7.57.39 PM(1)

Tags:

About The Author

Maharashtra Janshakti News Picture

Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कागदी पदव्यांपेक्षा स्वतःची क्षमता निर्माण करा- प्रख्यात रंगकर्मी प्रा.दिलीप घारे यांचे युवा कलावंतांना आवाहन- युवक महोत्सवाचा जल्लोषात समारोप   कागदी पदव्यांपेक्षा स्वतःची क्षमता निर्माण करा- प्रख्यात रंगकर्मी प्रा.दिलीप घारे यांचे युवा कलावंतांना आवाहन- युवक महोत्सवाचा जल्लोषात समारोप  
    कळंब,  :  आयुष्याच्या प्रत्येक टप्प्याला समजून घेतले पाहिजे आणि तो मनापासून जगला पाहिजे. अन्यथा पुढे पश्चात्ताप करण्याची वेळ येते.
राज्य शासनातर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर  - डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून चार जणांचा गौरव होणार - प्रा. डॉ.गुलाब खेडकर, डॉ.भारती गवळी यांचा होणार गौरव - प्राचार्य डॉ. भारत खंदारे, प्राचार्य डॉ.विजय भोसले यांचीही निवड
प्रा. यास्मिन शेख आणि चित्रकार श्रीधर अंभोरे यांना श्रद्धांजली सभेचे आयोजन
२३ ऑगस्ट रोजी YCMOUच्या विद्यार्थ्यांशी कुलगुरूंचा संवाद ; राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना मिळणार मार्गदर्शन
बालरंगभूमी परिषदेतर्फे आम्ही नाटक करीत आहोत सादरीकरण संपन्न ; परिषदेचे उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. हसन इनामदार व कोषाध्यक्ष विनोद आघाव यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला
बालरंगभूमी परिषदेच्या स्पर्धेत वयक्तिक गटात वीरा चांदोडकर व गार्गी  मानकर तर सांघिक गटात शारदा मंदिर कन्या शाळा सर्वोत्कृष्ट.
शेवटी झुरळ जिंकले......आंदोलकांचा मोठा विजय ! केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा
Join Us on Whatsapp