धनगर आरक्षणात शरद पवार यांनी घोळ घातला:आमदार गोपीचंद पडळकर यांचा आरोप; म्हणाले - जयंत पाटील फालतू माणूस
धनगर आरक्षणात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी घोळ घातल्याचा आरोप भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. गोपीचंद पडळकर आज कोल्हापुरातील पट्टणकोडोली येथील बिरदेव मंदिरातून धनगर जागर यात्रेस आज सुरुवात केली, यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी शरद पवारांवर हल्लाबोल केला आहे.
दरम्यान आमदार गोपीचंद पडळकर पुढे बोलताना म्हणाले की, धनगर आरक्षणाच्या आडवा येणाऱ्या लांडग्यांच्या पाठीत काठी मारण्यासाठी आता धनगर समाज सज्ज झालेला आहे. त्यामुळे धनगरांना आरक्षण मिळण्या वाचून कोणी रोखू शकणार नाही, असेही आमदार गोपीचंद पडळकर यांनी म्हटले आहे.
तर रस्त्यावर उतरा
आमदार पडळकर म्हणाले की, धनगर समाजाच्या आरक्षणासाठी रस्त्यावरची लढाई सुरू झाली आहे. डिसेंबर महिन्यापर्यंत धनगर आरक्षणाचा निकाल हाती येईल. जर निकाल मागे पुढे झाला तर धनगर समाजातील लोकांनी रस्त्यावर उतरावे, असा त्यांनी म्हटले आहे. धनगर आरक्षणाच्या आडवा येणाऱ्या लांडग्यांच्या पाठीत काठी मारण्यासाठी आता धनगर समाज सज्ज झालेला आहे. त्यामुळे धनगरांना आरक्षण मिळण्या वाचून कोणी रोखू शकणार नाही, असा वियवासही त्यांनी बोलून दाखवला आहे.
शरद पवारांवर अप्रत्यक्ष टीका
महाराष्ट्रात कुठला लांडगा भांडण लावतो, हे सर्व लोकांना माहिती आहे. रिपाई पक्षांचे तुकडे कुठल्या लांडग्याने केले? बी.के यांच्या पाठीत कुणी खंजीर खुपसला? धनगरांना एसटीऐवजी एनटीचा दाखला कुठल्या लांडग्याने दिला? असे सवाल उपस्थित करत पडळकरांनी शरद पवारांवर अप्रत्यक्षपणे हल्लाबोल केला.
फालतू माणसांवर बोलत नाही
गोपीचंद पडळकरांनी शरद पवारांना लक्ष्य करत ‘महाराष्ट्रात कुठला लांडगा भांडण लावतो, हे सर्व लोकांना माहिती आहे’ अशी टीका केली होता. याबद्दल प्रश्न विचारल्यावर जयंत पाटलांनी गोपींचद पडळकरांसारख्यांवर बोलत नसल्याचे सांगितले होते. याला गोपीचंद पडळकरांनी प्रत्युत्तर दिले आहे. जयंत पाटील यांच्यासारख्या फालतू माणसावर मी बोलत नाही, असे टीकास्र गोपीचंद पडळकरांनी डागले आहे.



About The Author
Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.


Comment List