नार्वेकरांना रस्त्यावर फिरणे अवघड होईल:त्या 40 जणांना फासावर लटकावण्याचे आदेश दिल्लीतून आलेत, संजय राऊत यांचा हल्लाबोल

नार्वेकरांना रस्त्यावर फिरणे अवघड होईल:त्या 40 जणांना फासावर लटकावण्याचे आदेश दिल्लीतून आलेत, संजय राऊत यांचा हल्लाबोल

शिवसेनेचे 40 व राष्ट्रवादी काँग्रेसचे तेवढेच आमदार आपापल्या मूळ घरांत चोरी करून पळून गेलेत. त्या चोरांना, दरोडेखोरांना विधानसभा अध्यक्ष सार्वभौमत्वाच्या नावावर संरक्षण देत असतील, तर खुर्ची गेल्यानंतर त्यांना महाराष्ट्राच्या रस्त्यांवर पायी फिरणे अवघड होईल, असा निर्वाणीचा इशारा शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिला आहे.

संजय राऊत यांनी मंगळवारी पत्रकारांशी संवाद साधला. त्यात त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर अपात्रतेची सुनावणी करण्यात जाणिवपूर्वक दिरंगाई करत असल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, हे सरकार संविधानविरोधी व बेकायदा आहे. सरकार चोर व लफंगे चालवत आहेत. त्यांना घटनात्मक पदावर बसलेली व्यक्ती संरक्षण देत असेल तर या देशात व राज्यात काय सुरू आहे याची कल्पना न केलेली बरी.

सार्वभौमत्वाचा अर्थ...

राहुल नार्वेकर वारंवार विधीमंडळाच्या सार्वभौमत्वाचा दाखला देत आहेत. पण सार्वभौमत्वाचा अर्थ चोरी करून एखाद्याने दुसऱ्याच्या घरात शिरावे आणि त्या घरातील मालकाने त्या चोराला, खून्याला संरक्षण द्यावे असा होत नाही, असे संजय राऊत म्हणाले.

शिवसेनेचे 40 व राष्ट्रवादीचेही तेवढेच आमदार आपल्या मूळ घरात चोरी व लूट करून गेलेत. त्या चोरांना, दरोडेखोरांना विधानसभेचे अध्यक्ष सार्वभौमत्वाच्या नावाने संरक्षण देत असतील तर राहुल नार्वेकरांचे नाव विधानसभा अध्यक्ष म्हणून या देशाच्या व राज्याच्या काळ्याकुट्ट इतिहासात नोंदले जाईल, असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.

रस्त्यावर फिरणेही अवघड होईल

माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यानंतर राहुल नार्वेकर उद्या जेव्हा ते खुर्चीवर नसतील तेव्हा त्यांना महाराष्ट्राच्या रस्त्यावर फिरणेही मुश्किल होईल. या राज्यातील जनता त्यांना माफ करणार नाही. तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे. 'त्यांना' (शिंदे गटाचे आमदार) फासावर लटकवण्याचे आदेश दिल्लीतून आलेत. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना लोकशाहीच्या मारेकऱ्यांची उपमा दिली आहे. पण कोर्टाने त्यांच्या अपात्रतेचे काम विधिमंडळाच्या अध्यक्षांवर सोपवले आहेत.

80 आमदारांना फासावर लटकवावे लागेल

सुप्रीम कोर्ट एखाद्या गुन्हेगाराला फाशीची शिक्षा सुनावते. पण फासावर लटकवण्यासाठी एका जल्लादाची गरज असते. न्यायमूर्ती त्यांना फासावर लटकवत नाहीत. हे जल्लादाचे काम करण्याची जबाबदारी विधिमंडळ अध्यक्षांवर आहे. त्यामुळे अध्यक्षांना शिवसेनेचे 40 व राष्ट्रवादीचे 40 अशा एकूण 80 आमदारांना घटनात्मकदृष्ट्या फासावर लटकावावेच लागेल. तुम्ही कितीही पळ काढण्याचा प्रयत्न केला तरी आता या आमदारांची सुटका नाही हे नार्वेकरांनी लक्षात घ्यावे, असे संजय राऊत म्हणाले.

महाराष्ट्राला चोरांच्या सरदाराची गरज नाही

नार्वेकरांचे वेळापत्रक लफंगेगिरी आहे. राहुल नार्वेकर चोरांचे सरदार म्हणून की संविधानाचे रखवालदार म्हणून काम करू इच्छितात हे त्यांनी ठरवावे. या महाराष्ट्राला चोरांच्या सरदाराची गरज नाही. महाराष्ट्राला संविधानाच्या रखवालदारांची गरज आहे. चौकीदार चोर आहे असे म्हटलं जाते. आता संविधानपीठावर बसणारे चोर आहेत असे म्हणण्याची वेळ महाराष्ट्रावर येऊ नये, असेही संजय राऊत यावेळी राहुल नार्वेकरांवर आगपाखड करताना म्हणाले

राहुल गांधींची सुवर्ण मंदिरात सेवा-001

WhatsApp Image 2023-10-06 at 5.02.42 PM

IMG-20230903-WA0117

Tags:

About The Author

Maharashtra Janshakti News Picture

Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कागदी पदव्यांपेक्षा स्वतःची क्षमता निर्माण करा- प्रख्यात रंगकर्मी प्रा.दिलीप घारे यांचे युवा कलावंतांना आवाहन- युवक महोत्सवाचा जल्लोषात समारोप   कागदी पदव्यांपेक्षा स्वतःची क्षमता निर्माण करा- प्रख्यात रंगकर्मी प्रा.दिलीप घारे यांचे युवा कलावंतांना आवाहन- युवक महोत्सवाचा जल्लोषात समारोप  
    कळंब,  :  आयुष्याच्या प्रत्येक टप्प्याला समजून घेतले पाहिजे आणि तो मनापासून जगला पाहिजे. अन्यथा पुढे पश्चात्ताप करण्याची वेळ येते.
राज्य शासनातर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर  - डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून चार जणांचा गौरव होणार - प्रा. डॉ.गुलाब खेडकर, डॉ.भारती गवळी यांचा होणार गौरव - प्राचार्य डॉ. भारत खंदारे, प्राचार्य डॉ.विजय भोसले यांचीही निवड
प्रा. यास्मिन शेख आणि चित्रकार श्रीधर अंभोरे यांना श्रद्धांजली सभेचे आयोजन
२३ ऑगस्ट रोजी YCMOUच्या विद्यार्थ्यांशी कुलगुरूंचा संवाद ; राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना मिळणार मार्गदर्शन
बालरंगभूमी परिषदेतर्फे आम्ही नाटक करीत आहोत सादरीकरण संपन्न ; परिषदेचे उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. हसन इनामदार व कोषाध्यक्ष विनोद आघाव यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला
बालरंगभूमी परिषदेच्या स्पर्धेत वयक्तिक गटात वीरा चांदोडकर व गार्गी  मानकर तर सांघिक गटात शारदा मंदिर कन्या शाळा सर्वोत्कृष्ट.
शेवटी झुरळ जिंकले......आंदोलकांचा मोठा विजय ! केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा
Join Us on Whatsapp