तुम्ही खूप आवडता, माझ्याजवळ पुढे बसयाला या म्हणत रिक्षा चालकाकडून महिलेचा विनयभंग
एक 35 वर्षीय महिला औंधमधील ब्रेमेन चौक ते खडकीमधील पडळ वस्ती दरम्यान रिक्षाने प्रवास करत होती. त्यावेळी अचानक रिक्षा चालक महिलेकडे अश्लील नजरेने पाहत चालकाने महिलेस आरशातून डोळा मारून नंतर रिक्षा हळू घेऊन मागे वळून महिलेस ' मला तुम्ही खूप आवडताय जरा माझ्याजवळ पुढे बसयाला या ना ' असे म्हणून विनयभंग केला आहे. या घटनेनंतर महीलेने थेट पोलिस ठाणे गाठत आरोपी विरोधात तक्रार दिली. त्यानुसार रिक्षा चालक रियाज समाद शेख (रा.बोपोडी, पुणे) याला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. याबाबत पुढील तपास चातूर्शृंगी पोलिस करत आहे.
दुकान मालकाकडून तरुणीचा विनयभंग
दुकानात काम करत असलेले एका 20 वर्षीय तरुणीचा दुकान मालकांनी विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार हडपसर परिसरात घडला आहे. या प्रकरणी आरोपी विरोधात हडपसर पोलिस ठाणे येथे तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार विनोद रमेश कुलकर्णी ( राहणार -लोणीकाळभोर ,पुणे )या आरोपी विरोधात विनयभंगचा गुन्हा पोलिसांनी दाखल केलेला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,तक्रारदार महिला आरोपी विनोद कुलकर्णी यांच्या ज्वेलर्स दुकानात काम करण्यासाठी आहे. संबंधित तरुणी दुकानात काम करत असताना, पहिल्या मजल्यावर दुकानाचे मालक विनोद कुलकर्णी यांनी तिला जवळ बोलावले. तिचा हात पकडून हात तिच्या ओठावर तसेच स्वतःच्या ओठावर फिरवून तिच्याकडे पाहून अश्लील हातवारे करून तिचा विनयभंग केला आहे. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक एस गोसावी पुढील तपास करत आहे.



About The Author
Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.


Comment List