• जरागेंच्या सभेला हिंसक करण्याचा सरकारचा डाव होता:ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांचा गंभीर आरोप
- मनोज जरांगे पाटील यांचे आरोप खरे आहेत. आंतरवाली सराटी येथे झालेल्या जरागेंच्या सभेला हिंसक करण्याचा सरकारचा डाव होता, असा गंभीर आरोप ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी केला आहे.
- दरम्यान विनायक राऊत पुढे बोलताना म्हणाले की, जरांगेंच्या सभेला हिंसक वळण लावण्याचा राज्यकर्त्यांचा कट सुरू होते,आंदोलनाला हिंसक वळण लागावे, असा डाव शासनातील काही जणांचा होता, पण तो फसल्याचे राऊतांनी म्हटले आहे.
- नार्वेकर वेळकाढूपणा करताय
- विनायक राऊत म्हणाले की, आमदार अपात्रतेप्रकरणाच्या सुनावणीबाबत सर्वोच्च न्यायालयानेच थेट हस्तक्षेप करावा असे मला वाटते. कायद्याचे रक्षण करायचे असेल तर सर्वोच्च न्यायालयाला आदेश देण्याशिवाय पर्याय नाही. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कायदा मोडला नाही, पण वेळकाढूपणा ते करत आहेत. त्याचा फायदा थेट शिंदे गटाला होत आहे.
- बोरवणकरांनी सत्य लिहले
- विनायक राऊत म्हणाले की, मीरा बोरवणकर यांनी पुस्तकात जे लिहिले आहे, ते 1001 टक्के सत्य असल्याचे म्हणत त्यांनी पुण्याच्या माजी पोलिस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी आपल्या पुस्तकात अजित पवार यांच्यावर खळबळजनक आरोप केले आहेत त्यावर प्रतिक्रिया दिली आहे



Tags:
About The Author
Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.
Related Posts
Post Comment
Latest News
03 Sep 2026 01:35:43
कळंब, : आयुष्याच्या प्रत्येक टप्प्याला समजून घेतले पाहिजे आणि तो मनापासून जगला पाहिजे. अन्यथा पुढे पश्चात्ताप करण्याची वेळ येते.


Comment List