आंबेडकरवादी युवा वक्तृत्व स्पर्धेत प्रशिक अंभोरे प्रथम तर वैष्णवी साबळे द्वितीय
प्रत्येक वर्षी आंबेडकरवादी युवा वकृत्व स्पर्धा होणार:- प्रकाश उजगरे
औरंगाबाद:-डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि बौद्ध धम्माची मानवी जीवनातील उपयोगिता यावर विचार मंथन व्हावे यासाठी धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून शहरातील डॉ.आंबेडकर विधी महाविद्यालय, नागसेनवन, औरंगाबाद. येथे आयोजित एक दिवसीय राज्यस्तरीय आंबेडकरवादी युवा वक्ता स्पर्धेचे आयोजन आज रोजी पर पडले.
या स्पर्धेत राज्यभरातून आलेल्या विविध शाखेतील विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला. यावेळेस स्पर्धकांचे विचार ऐकण्यासाठी प्रेक्षकांची उपस्थिती आणि प्रतिसाद वाखाणण्याजोगी होती. स्पर्धेअंती विजय स्पर्धकांना प्रथम विजेता कु.प्रशिक अंभोरे- 10,000, द्वितीय विजेती कु.वैष्णवी साबळे-5000, तृतीय विजेता रामेश्वर कांबळे- 3000. यांना कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले डॉ. संदीप गायकवाड, प्रा. डॉ. किशोर वाघ, राहुल त्रिभुवन यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.
यावेळेस उपस्थितांना डॉ. आंबेडकर विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ प्रमोद हेरोडे यांनी प्रमुख मार्गदर्शन केले. तसेच कार्यक्रमास प्रमुख उपस्थित असलेले डॉ. प्रकाश इंगळे, बेगमपुरा पोलीस स्टेशनचे पो.निरीक्षक विनोद भालेराव यांनी आपले विचार मांडले.
स्पर्धेदरम्यान स्पर्धकांच्या विचारांचे मूल्यमापन करून योग्य उमेदवार निवडण्याची परीक्षक भूमिका डॉ. मिलिंद वाव्हळे, सिद्धार्थ शिनगारे व डॉ. संजय पाईकराव यांनी पार पाडली.
स्पर्धेचे हे प्रथम वर्ष असून दरवर्षी 14 ऑक्टोंबर रोजी धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून ही स्पर्धा आयोजित केली जाईल. तरी राज्यभरातून विविध विचारांच्या विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग नोंदवून आपले मत मांडावे असे आवाहन स्पर्धेचे आयोजक परिवर्तनाचे शिलेदार या विद्यार्थी चळवळ संघटने कडून करण्यात आले.
स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी दीपक पंडीत, संतोष शिरसाठ, चंचल जगताप, ज्आकाश खंदारे, अक्षय टाकणसार, ञानेश्वर काळे, तसेच संघटनेतील शिलेदारांनी आपले योगदान दिले.


About The Author
Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.


Comment List