अहमदनगर - आष्टी रेल्वेला भीषण आग:2 ते 3 डबे भस्मसात, प्रवाशांनी उड्या मारून वाचवला स्वतःचा जीव
- समृद्धी महामार्गावरील भीषण अपघातामुळे अवघ्या महाराष्ट्राचे मन सुन्न झाले असताना अहमदनगर - आष्टी रेल्वेला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनेत रेल्वेचे 2 कोच जळून भस्मसात झालेत. सुदैवाने प्रवाशांनी वेळीच डब्याबाहेर उड्या मारल्यामुळे या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
- आगीचे कारण अद्याप स्पष्ट नाही
- यासंबंधीच्या वृत्तानुसार, सोमवारी दुपारी साडे 3 च्या सुमारास शिराडोह परिसरात अहमदनगर - आष्टी रेल्वेच्या 2 डब्यांना आग लागली. त्यानंतर लगेच प्रवाशांनी बाहेर उड्या मारून स्वतःचा जीव वाचवला. ही आग नेमकी कशामुळे लागली? हे अद्याप स्पष्ट झाले नाही. रेल्वेला आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली.
- रेल्वे इंजिनच्या मागचे 2 डबे भस्मसात
- सदर आग रेल्वे इंजिनाला चिकटून असणाऱ्या पहिल्या 2 डब्यांना लागली. हे डबे जनरल बोगीचे होते. पण सुदैवाने या डब्यांत फारशी गर्दी नव्हती. आगीने काही वेळातच रौद्र रूप धारण केले. त्यामुळे रेल्वे चालकाने प्रसंगावधान राखून वेळीच रेल्वे रोखली. त्यानंतर अग्निशमन दलाला या घटनेची कल्पना देण्यात आली. त्यानंतर काही वेळातच अग्निशमन दलाच्या 5 गाड्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले.
- प्रवाशांचा प्रतिसाद नसल्याने गर्दी नव्हती
नगर - बीड - परळी या मार्गावर सप्टेंबर 2022 मध्ये नगर ते आष्टी या काम पूर्ण झालेल्या टप्यात रेल्वेसेवा सुरू करण्यात आली आहे. सुरवातीला 2 गाड्या सोडण्यात येत होत्या. पण प्रवाशांचा कमी प्रतिसाद मिळत असल्यामुळे सकाळी एकच गाडी सोडण्यात येत आहे. त्यानुसार सोमवारी सकाळी नगरहून ही गाडी प्रवासी घेऊन आष्टीला गेली. तेथून परत येत असताना नगर तालुक्यातील वाळूज या गावाजवळ आग लागली. नगर - सोलापूर महामार्गाच्या क्रॉसिंगजवळ ही घटना घडली. - प्रवाशांमध्ये चांगलीच घबराट
- प्रत्यक्षदर्शींच्या मते, ही आग एवढी भीषण होती की, त्यात रेल्वेचे मोठे नुकसान झाले. सध्या अग्निशमन दल आग विझवण्याचे युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहे. आग लागली तेव्हा रेल्वेत फारशी गर्दी नव्हती. त्यामुळे सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. पण या घटनेमुळे प्रवाशांमध्ये चांगलीच घबराट निर्माण झाली आहे.



Tags:
About The Author
Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.
Related Posts
Post Comment
Latest News
03 Sep 2026 01:35:43
कळंब, : आयुष्याच्या प्रत्येक टप्प्याला समजून घेतले पाहिजे आणि तो मनापासून जगला पाहिजे. अन्यथा पुढे पश्चात्ताप करण्याची वेळ येते.


Comment List