शरद पवारांचे निकटवर्तीय असलेल्या 7 उद्योगपतींवर EDची कारवाई:केंद्रीय यंत्रणांकडून संपत्ती जप्त करण्याचा सपाटा; BJPविरोधी बोलत असल्याचा परिणाम?

शरद पवारांचे निकटवर्तीय असलेल्या 7 उद्योगपतींवर EDची कारवाई:केंद्रीय यंत्रणांकडून संपत्ती जप्त करण्याचा सपाटा; BJPविरोधी बोलत असल्याचा परिणाम?

पक्षात फूट पडल्यानंतर अधिक जोमाने व दिवसेंदिवस राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार मैदानात उतरून भाजप विरोधात आक्रमक भूमिका घेत आहेत. तर दुसरीकडे शरद पवार यांच्या निकटवर्तीयांवर धाडी टाकून त्यांची संपत्ती जप्त करण्याचा सपाटा केंद्रीय यंत्रणांकडून लावण्यात आला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादीचे माजी कोषाध्यक्ष ईश्वरलाल जैन यांची तब्बल 315. 6 कोटी रुपयांची संपत्ती केंद्रीय यंत्रणांनी जप्त केली. त्या आधी पवारांच्या जवळच्या 6 जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

15 वर्षे खजिनदार होते ईश्वरलाल जैन
राष्ट्रवादीचे पंधरा वर्षे खजिनदार असलेले आणि राज्यसभा सदस्य असलेले ईश्वरलाल शंकरलाल जैन आणि त्यांचा मुलगा मनीष जैन यांच्यावर काही दिवसांपूर्वीच ईडीने धाडी टाकल्याचे पाहायला मिळालं होतं. या धाडी प्रामुख्याने महाराष्ट्रात जळगाव, मुंबई, ठाणे, सिल्लोड आणि गुजरात मधील कच्छ या ठिकाणी टाकण्यात आल्या होत्या.

315 कोटींची चल व अचल संपत्ती जप्त
ईडीच्या वतीने टाकण्यात आलेल्या धाडीला आता एक महिना होत असतानाच आता ईश्वरलाल जैन यांची आर्थिक रसद बंद करण्याचा प्रयत्न ईडीच्या वतीने करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. कारण ईश्वरलाल जैन यांचे तब्बल 315 कोटींची चल आणि आचल संपत्तीने ईडीने जप्त केली आहे.

ईश्वरलाल जैन कोण आहेत?
शरद पवार यांचे विश्वासू सहकारी अशी त्यांची ओळख आहे. 15 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कोषाध्यक्ष, तसेच राज्यसभेचे माजी खासदार राहिलेले आहेत. मुलगा मनीष जैन माजी आमदार..राजमल लखीचंद ज्वेलर्सचे प्रमुख. जळगाव सह महाराष्ट्र आणि गुजरात मध्ये देखील ज्वेलर्सचा व्यवसाय.

PMLA कायद्यानुसार कारवाई
या संपूर्ण प्रकरणी ईडीच्या वतीने पत्रकाच्या माध्यमातून माहिती देण्यात आली आहे की शनिवारी पीएमएलए कायद्यानुसार राजमल लखीचंद ज्वेलर्स, आर एल गोल्ड प्रायव्हेट लिमिटेड, मनराज ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांवर बँकांची फसवणूक केल्याप्रकरणी महाराष्ट्रातील जळगाव, मुंबई, ठाणे, सिल्लोड आणि गुजरात मधील कच्छ या ठिकाणी असलेल्या संपत्तीवर टाच आणण्यात आली आहे. यामध्ये पवन चक्की, चांदी, हिरे, सोने आणि भारतीय मुद्रा अशी संपत्ती जप्त करण्यात आली आहे.

शरद पवार भाजपविरोधात बोलतात?
जैन यांच्यावर कारवाई करताना कुठेतरी दिवसेंदिवस शरद पवार भाजप विरोधात होत असलेले आक्रमक आणि इंडियाची वाढणारी ताकद या बाबी डोळ्यासमोर ठेवून शरद पवारांच्या निकटवर्तीयांना टार्गेट करण्याचा प्रयत्न तर केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून होत नाही ना अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. कारण मागच्या काही दिवसात पवारांच्या जवळच्या सहा व्यक्तींवर केंद्रीय यंत्रणांनी कारवाई केली आहे.

पवारांच्या 'या' निकटवर्तीयांवर कारवाई

  • वाधवान बिल्डर (एचडीआयएल प्रकरण) मार्केटींग कंपनीची 88 कोटी रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली हाऊसिंग डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडचे राकेश वाधवान आणि सारंग वाधवान यांच्या कार्यालयावर छापे आणि अटक.
  • दिवाण बिल्डर (डीएचएफएल प्रकरण) या प्रकरणात सतरा विविध बँकांची करोडो रुपयांची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप असून यामध्ये अविनाश भोसले आणि वादवान बंधू यांच्या कंपन्यांना पैसा दिल्याचा आरोप आहे. अविनाश भोसले आणि वादवान हे दोघेही शरद पवारांचे निकटवर्ती आहेत.
  • अनिरुद्ध देशपांडे एमनोरा टाऊनशिप चे मालक आणि सिटी बँकेचे चेअरमन यांच्यावर ईडीची धाड. आर्थिक गैर व्यवहारातून या धाडी पडल्याची माहिती.
  • अविनाश भोसले डीएचएफएल येस बँक लोन प्रकरणी अविनाश भोसले यांच्यावर सीबीआयची कारवाई. भोसले यांचा एक हेलिकॉप्टर देखील ताब्यात.
  • नरेश गोयल- जेट एअरवेज 538 कोटी रुपयांच्या गतीत बँक फसवणुकी प्रकरणी ईडीची कारवाई. नरेश गोयल आणि त्यांच्या पत्नी विरोधात मनी लॉन्ड्रिंग केस.
  • राणा कपूर येस बँकेचे अध्यक्ष असताना राणा कपूर यांनी डीएचएफएल, एचडीआयएल अबिल यासारख्या कंपन्यांना मोठ्या रकमेचे कर्ज दिले आणि त्या बदल्यात लाच घेतली. येस बँकेने तीस हजार कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले आणि त्यापैकी वीस हजार कोटी रुपये बुडीत कर्जात बदलले. यासाठी देखील लाच घेतल्याचा आरोप आहे.
  • राहुल गांधींची सुवर्ण मंदिरात सेवा-001       WhatsApp Image 2023-10-06 at 5.02.42 PM IMG-20230903-WA0117
Tags:

About The Author

Maharashtra Janshakti News Picture

Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कागदी पदव्यांपेक्षा स्वतःची क्षमता निर्माण करा- प्रख्यात रंगकर्मी प्रा.दिलीप घारे यांचे युवा कलावंतांना आवाहन- युवक महोत्सवाचा जल्लोषात समारोप   कागदी पदव्यांपेक्षा स्वतःची क्षमता निर्माण करा- प्रख्यात रंगकर्मी प्रा.दिलीप घारे यांचे युवा कलावंतांना आवाहन- युवक महोत्सवाचा जल्लोषात समारोप  
    कळंब,  :  आयुष्याच्या प्रत्येक टप्प्याला समजून घेतले पाहिजे आणि तो मनापासून जगला पाहिजे. अन्यथा पुढे पश्चात्ताप करण्याची वेळ येते.
राज्य शासनातर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर  - डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून चार जणांचा गौरव होणार - प्रा. डॉ.गुलाब खेडकर, डॉ.भारती गवळी यांचा होणार गौरव - प्राचार्य डॉ. भारत खंदारे, प्राचार्य डॉ.विजय भोसले यांचीही निवड
प्रा. यास्मिन शेख आणि चित्रकार श्रीधर अंभोरे यांना श्रद्धांजली सभेचे आयोजन
२३ ऑगस्ट रोजी YCMOUच्या विद्यार्थ्यांशी कुलगुरूंचा संवाद ; राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना मिळणार मार्गदर्शन
बालरंगभूमी परिषदेतर्फे आम्ही नाटक करीत आहोत सादरीकरण संपन्न ; परिषदेचे उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. हसन इनामदार व कोषाध्यक्ष विनोद आघाव यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला
बालरंगभूमी परिषदेच्या स्पर्धेत वयक्तिक गटात वीरा चांदोडकर व गार्गी  मानकर तर सांघिक गटात शारदा मंदिर कन्या शाळा सर्वोत्कृष्ट.
शेवटी झुरळ जिंकले......आंदोलकांचा मोठा विजय ! केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा
Join Us on Whatsapp