खासगी कंपनीने सरकारी शाळा दत्तक घेतली आणि त्या शाळेत चक्क गौतमी पाटील चा डान्स ठेवला; शरद पवारांचा गंभीर आरोप
जिल्हा परिषदेची शाळा दत्तक घेतलेल्या एका कंपनीने शाळेत गौतमी पाटील यांचा कार्यक्रम ठेवल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. त्यांनी यासंबंधी सरकारी शाळा खासगी कंपन्यांना चालवण्यास देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर जोरदार हरकत घेतली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे मनमानी पद्धतीने काम करण्याचे प्रकार वाढतील, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.
नाशिकची एक शाळा मद्य निर्मिती करणाऱ्या कंपनीने दत्तक घेतली होती. त्यानंतर या कंपनीने शाळेत गौतमी पाटील यांच्या नृत्याचा कार्यक्रम ठेवला होता, असे शरद पवार बुधवारी राष्ट्रवादी महिला काँग्रेसने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना म्हणाले. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, रोहिणी खडसे आदी नेते उपस्थित होते.
सरकार बदलल्यावर केसेस हटवू
दरम्यान शरद पवार पुढे बोलताना म्हणाले की, समाजात चुकीचे काही दिसले तर रस्त्यावर उतरा, सरकार केसेस टाकेल, पण तरीही घाबरु नका, सरकार बदलत असते, आपण त्या केसेस मागे घेतो असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महिलांना राजकारणात सक्रिय होण्यास सांगितले आहे. तर कुठे अन्याय होत असल्यास रस्त्यावर उतरत आक्रमक होण्यास सांगितले आहे.
कंपन्यांना शाळेत हस्तक्षेप करण्याचा अधिकार
शरद पवार यावेळी म्हणाले की, सरकार जिल्हा परिषदेच्या शाळा खासगी कंपन्यांना चालवण्यास देत आहे. या शाळा कंपन्यांच्या सीएसआर खात्यातून चालवण्यात याव्यात. या माध्यमातून शाळांचा विकास साधण्याचा सरकारचा मानस आहे. पण यामुळे एक वेगळाच धोका निर्माण होण्याची भीती आहे. यापुढे जी कंपनी शाळा दत्तक घेईल, त्या शाळेला कोणते नाव द्यायचे याचा पूर्ण अधिकार संबंधित कंपनीला असणार आहे. भविष्यात त्या कंपनीला शाळेच्या कारभारात हस्तक्षेप करण्याचा पूर्ण अधिकार असेल, असे शरद पवार म्हणाले.
शाळेत गौतमीच्या डान्सचा कार्यक्रम
यामुळे शाळेची शासकीय मालमत्तेचा वापर वैयक्तिक कारणांसाठी होईल. याचे एक उत्तम उदाहरण सांगतो. नाशिकमधील एक शाळा मद्य तयार करणाऱ्या कंपनीने दत्तक घेतली आहे. त्या शाळेमध्ये नुकताच गौतमी पाटील यांच्या नृत्याचा कार्यक्रम घेतला गेला. आता असा आदर्श आम्ही मुलांसमोर ठेवणार आहोत? त्यामुळे सरकारी शाळा खासगी कंपनीला देण्याच्या सरकारच्या निर्णयाला सर्वांनीच विरोध केला पाहिजे, असेही शरद पवार यावेळी राज्य सरकारवर निशाणा साधताना म्हणाले.



About The Author
Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.


Comment List