शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरेंची सभा; एकनाथ शिंदे गटाने घेतली माघार
- ऐतिहासिक दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क शिवसेनेच्या कोणत्या गटाला मिळणार याचा निर्णय अखेर झाला आहे. या वादावर पडदा टाकत शिंदे सरकारचे मंत्री दीपक केसरकर यांची शिंदे गटाचा दसरा मेळावा हा दक्षिण मुंबईतील क्रॉस आणि ओव्हल मैदानावर होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. वास्तविक शिवाजी पार्कसाठी शिवसेना (शिंदे गट) आणि ठाकरे गट दोघेही आग्रही होते. मात्र, आता या वादावर आता पडदा पडला असल्याची चर्चा आहे. शिवाजी पार्क मैदानाच्या या लढाईतून शिंदे गटाने माघार घेतली आहे.
- राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर आता दोन्ही गटाची लढाई निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. मात्र, या कायदेशीर लढाई व्यतिरीक्त शरद पवार गटाला प्रत्युत्तर देण्यासाठी ज्या-ज्या ठिकाणी शरद पवार यांची सभा होईल, त्या-त्या ठिकाणी सभा घेण्याचा निर्णय अजित पवार गटाने घेतला आहे. इतकेच नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदारांचे प्रश्न सोडवण्यासाठी विशेष लक्ष केंद्रीत करणार असल्याचा निर्णय अजित पवार यांनी घेतला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीची लढाई आता अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
- आज दुपारी 12 वाजता राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक बोलावण्यात आली आहे. त्यापूर्वी अजित पवार गटाच्या मंत्र्यांची देवगिरी बंगल्यावर बैठक होत आहे. मंत्र्यांसोबत आमदार दत्ता भरणे, शेखर निकम, निलेश लंके हे देखील बैठकीला उपस्थित राहणार आहेत. मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोणते महत्त्वाचे निर्णय होतात, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
- मुंबई नाशिक महामार्गावर पाडळी फाट्याजवळ स्विफ्ट कार कंटेनरखाली घुसल्याने झालेल्या अपघातात 5 जण जखमी झाले आहेत. कारचालकाला डुलकी लागल्याने पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला. चौघे जण गंभीर जखमी असून एका प्रवाशाला किरकोळ मार लागला असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.
- छत्रपती संभाजीनगरमधील विभागीय क्रीडा संकुल मैदानावर आज सायंकाळी 5 वाजता मनोज जरांगे पाटील यांची सभा होणार आहे. त्यानिमित्त सोमवारी आयोजकांनी महत्त्वपूर्ण बैठक घेऊन तयारी केली. मराठा बांधवांनी सभेला येण्यापूर्वी व सभेत शांतता बाळगावी. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन विजय काकडे पाटील, गणेश उगले पाटील यांनी पत्रकार परिषदेत केले. आरक्षणासाठी सकल मराठा समाज बांधवांनी रस्त्यावर उतरून 58 मोर्चे शांततेत काढले. त्याचा जगाने आदर्श घेतला. त्याच धर्तीवर आंतरवाली सराटी येथेही शांततेत आंदोलन सुरू होते, पण काही पोलिसांनी अमानुष लाठीहल्ला, गोळीबार केला. त्यामुळे अाता प्रत्येकाने सावध राहावे. जो कुणी गडबड, गोंधळ करण्याचा प्रयत्न करेल त्यांना वेळीच आवर घाला. सभा शांततेत पार पडेल, यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. तसेच सभेला पोलिस परवानगी मिळाल्याचेही काकडे यांनी सांगितले.
- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अविनाश जाधव यांच्यासह 12 मनसेच्या कार्यकर्तयांना रात्री उशीरा जामीन मंजूर करण्यात आला आहे. मुलंड टोलनाक्यावर प्रतिकात्मक आंदोलन केल्याप्रकरणी नवघर पोलिसांनी अविनाश जाधव यांच्यासह काही मनसैनिकांना काल ताब्यात घेतले होते. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. मात्र, सोमवारी रात्री उशीरा अविनाश जाधव यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.
- मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर दोन तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या एक्स्प्रेस वेवर मोठे दिशादर्शक फलक बसवण्यासाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. आज दुपारी 12 ते 2 दरम्यान पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद राहणार असल्याने प्रवाशांची तारांबळ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरुन हलक्या वाहनांसाठी शिंग्रोबा घाटातील वाहतूक सुरु राहणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने कळवण्यात आले आहे.
- मुंबई सेंट्रल ते बोरिवली या सहाव्या मार्गिकेच्या जोडणीचे काम पश्चिम रेल्वेने सुरू केले आहे. सध्या प्राथमिक काम सुरू असून मुख्य काम दसऱ्यानंतर म्हणजेच 25 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे. या दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार असून यामध्ये रोज सरासरी 250 लोकल आणि 61 मेल-एक्स्प्रेस रद्द करण्यात येणार आहेत. यामुळे दसऱ्यानंतर पश्चिम रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना थोडा त्रास सहन करावा लागणार आहे.
https://instagram.com/maharashtra_janshakti_news?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==



Tags:
About The Author
Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.
Related Posts
Post Comment
Latest News
03 Sep 2026 01:35:43
कळंब, : आयुष्याच्या प्रत्येक टप्प्याला समजून घेतले पाहिजे आणि तो मनापासून जगला पाहिजे. अन्यथा पुढे पश्चात्ताप करण्याची वेळ येते.


Comment List