पत्रकार भवनात दावत-ए-इफ्तार : जिंतूरमध्ये सामाजिक सलोख्याचे वातावरण
जिंतूर, प्रतिनिधी / बी.डी.रामपूरकर
पवित्र रमजान महिन्याच्या निमित्ताने जिंतूर तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही दावत-ए-इफ्तार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शहरातील भाजी मंडी परिसरातील पत्रकार भवन येथे आयोजित या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवर, पत्रकार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून सामाजिक एकोपा व बंधुभावाचा संदेश दिला.
रमजानच्या पवित्र महिन्यात रोजा सोडल्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या या दावत-ए-इफ्तार कार्यक्रमात सर्व धर्मीय मान्यवरांनी एकत्रितपणे सहभागी होत सौहार्दाचे वातावरण निर्माण केले. यावेळी सेलू येथील उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी, नायब तहसीलदार प्रशांत राखे, पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे, जिंतूर नगराध्यक्ष प्रताप देशमुख, ॲड. मनोज सारडा, नगरसेवक इस्माईल पहलवान, डॉ. दुर्गादास कान्हडकर, प्रदीप चौधरी, ॲड. गोपाळ रोकडे, डॉ. इरफान पटेल, डॉ. जुनेद, टिका खान, जेष्ठ पत्रकार एम. ए. माजिद, निहाल अहमद, शेख शकील, अजमत पठाण, प्रभाकर लिखे, माजी सैनिक बालाजी शिंदे, बाळासाहेब काजळे यांच्यासह तालुक्यातील अनेक पत्रकार व मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन जिंतूर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष बालाजी शिंदे सोसकर, सचिव महेश देशमुख आणि कार्याध्यक्ष शिराज सिद्दिकी यांच्या पुढाकारातून करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी एकत्रितपणे इफ्तार करत परस्पर संवाद साधला आणि समाजात बंधुभाव, शांतता व ऐक्य टिकवण्याचा संदेश दिला.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी पत्रकार संघाच्या या उपक्रमाचे कौतुक करत अशा सामाजिक एकात्मता वाढविणाऱ्या कार्यक्रमांमुळे समाजात सकारात्मक वातावरण निर्माण होत असल्याचे मत व्यक्त केले. रमजानच्या पवित्र महिन्यात आयोजित करण्यात आलेल्या या दावत-ए-इफ्तार कार्यक्रमामुळे जिंतूर शहरात सामाजिक सलोखा व एकतेचे वातावरण अधिक दृढ झाल्याचेही उपस्थितांनी नमूद केले.

आपली शाळा, महविद्यालय,संस्था व संघटना यांच्या बातम्या, फोटो 7588005002 या नंबर वर व्हॉट्स ॲप वर पाठवा....कथा,कविता,पुस्तक परीक्षण, वैचारिक लेखन देखील उपरोक्त नंबर पाठवावे


About The Author
Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.


Comment List