श्रीकृष्ण महाविद्यालय गुंजोटी येथे ६ आणि ७ मार्च रोजी राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन
उमरगा : (प्रा.नागसेन कांबळे)
गुंजोटी येथील श्रीकृष्ण महाविद्यालयात आज डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संभाजीनगर आणि श्रीकृष्ण महाविद्यालय गुंजोटी यांच्या संयुक्त विद्यमाने व प्राणीशास्त्र ,वनस्पतीशास्त्र विभागाच्या वतीने "शाश्वत विकासासाठी जैविक विज्ञानातील अलीकडील कल "(RECENT TRENDS IN BIOLOGICAL SCIENCE S FOR SUSTAINABLE DEVELOPMENT-2026) या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. दि. ०६/०३/२०२६ ते ०७/०३/२०२६ या दोन दिवसांपैकी पहिला एक दिवस ऑनलाइन चर्चासत्र पार पडणार असून दुसऱ्या दिवशी ऑफलाईन चर्चासत्र संपन्न होणार आहे.या परिसंवादाचे उद्घाटन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील वनस्पतीशास्त्र विभागाचे विभागप्रमुख प्रा. डॉ. अरविंद धाबे यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, दिल्ली येथील प्रा. अरुण खरात हे राहणार आहेत.तर स्वागताध्यक्ष म्हणून श्रीकृष्ण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.गुलाब राठोड हे राहणार आहेत.पहिल्या सत्रात प्रमुख वक्ते म्हणून गुलबर्गा विद्यापीठ, कलबुर्गी येथील वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रमुख जी. एम. विद्यासागर हे राहणार आहेत. त्याचबरोबर वाडिया कॉलेज पुणे येथील सी. जे. हिवरे, कलबुर्गी विद्यापीठातील प्राणीशास्त्र विभागप्रमुख प्रा. के. विजयकुमार यांचेही जैविक विज्ञानाशी संलग्नित विविध विषयावर व्याख्यान होणार आहे. विज्ञान आणि प्रगती यांची सांगड घातली तरच शाश्वत विकासाची चिरंतनता आपल्याला अधोरेखित करता येते खरे पाहिले तर जैविक विज्ञान हे अनेक कार्यक्षेत्रांच्या केंद्रस्थानी आहे ते अनेक क्षेत्रांशी निगडित आहे आजच्या शतकातील शेती, शेतीपूरक व्यवसाय आरोग्य हवामानातील बदल अन्नसुरक्षा पर्यावरणाचा ऱ्हास यासारख्या आपल्याला कायम भेडसावणाऱ्या समस्यासाठी उपयुक्त ठरू शकते किंबहुना ते उपयुक्त आहे. असेच म्हणावे लागेल जागतिक आरोग्य आणि दर्जेदार जीवनशैली यासाठी अनेक नवनवीन उपयुक्त संशोधनातून संपन्न जीवनाच्या अज्ञात कक्षा त्यामुळे उघडल्या जाऊ शकतात. जैविक विज्ञानाच्या क्षेत्रात अलीकडच्या काळात झालेल्या नवनवीन संशोधन व शैलीतून झालेल्या प्रगतीशी सुसंगत राहून मानवी चिरंतन विकासासाठी जैविक विज्ञानातील अलीकडील ट्रेंड्स 2026 या विषयावर जाणीवपूर्वक परिसंवादाचे आयोजन करण्यात आलेली आहे .त्यामुळे या परिसंवादात जास्तीत जास्त प्राध्यापक, संशोधक आणि संशोधक विद्यार्थी यांनी सहभाग नोंदवावा असे आव्हान संयोजन समितीचे डॉ. दस्तगीर पठाण (9423740755) व प्राचार्य डॉ.गुलाब राठोड (9834515055)यांनी केली आहे.



आपली शाळा, महविद्यालय,संस्था व संघटना यांच्या बातम्या, फोटो 7588005002 या नंबर वर व्हॉट्स ॲप वर पाठवा....कथा,कविता,पुस्तक परीक्षण, वैचारिक लेखन देखील उपरोक्त नंबर पाठवावे
.jpeg)

About The Author
Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.


Comment List