महापौर निवडणुकीत तुफान राडा, काँग्रेस विरुद्ध MIM चे नगरसेवक भिडले, बांगड्या फेकून मारल्या
अकोला: अकोल्यामध्ये महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये काँग्रेस आणि एमआयएमच्या नगरसेवकांमध्ये तुफान राडा झाला. काँग्रेसच्या नगरसेवकांनी एमआयएमच्या नगरसेवकांवर बांगड्या फेकल्या. अकोला महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपच्या शारदा खेडकर यांच्या निवड झाली. त्यानंतर सभागृहात हा तुफान राडा झाला. काँग्रेसच्या नगरसेवकांनी धमक्या दिल्याचा एमआयएमच्या नगरसेवकांचा आरोप आहे.
काँग्रेस आणि एमआयएमचे नगरसेवक भिडले. एमआयएमचे तीन नगरसेवक ऐनवेळी तटस्थ राहिले, त्यावरुन दोन्ही गटांमध्ये वाद झाला आणि त्याचं रुपांतर राड्यामध्ये झालं. काँग्रेसनं दादागिरी केल्याचा आरोप नगरसेवकांनी केला आहे. एमआयएमच्या तीन नगरसेवकांनी गद्दारी केल्याचा आरोप काँग्रेसनं केला. अकोला महानगरपालिकेचा पहिलाच दिवस राड्यानं गाजला. दरवेळी प्रमाणे याहीवेळी हा दिवस तुफान राड्याने गाजला आहे. त्यामुळे याची चर्चा होत आहे.
अकोला महापौर पदी भाजप प्रणित शहर सुधार आघाडीच्या शारदा खेडकर 45 मते घेऊन विजयी. उबाठाच्या उमेदवार सुरेखा काळे यांचा 13 मतांनी केला पराभव. काळे यांना मिळाले 32 मते. तर एमआयएम च्या 3 नगरसेवकांनी तटस्थ भूमिका घेतली असून भाजपचे अपक्ष बंडखोर नगर सेवक आशिष पवित्रकार यांनी अखेर घरवापसी करत भाजपला मतदान केले.
अकोल्यात पुन्हा एकदा भाजपने सत्ता राखली आहे. शहर सुधार आघाडीकडून भाजपने आपली सत्ता आणली आहे. भाजपच्या शारदा खेडकर या महापौर पदी विराजमान झाल्याची माहिती आहे. तर उपमहापौर पदी भाजपचे अमोल गोगे यांची निवड झाली आहे. 80 नगरसेवक संख्या असलेल्या अकोल्यात महापालिका निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर भाजप हा 38 जागा जिंकून एक नंबरचा पक्ष ठरला मात्र बहुमताचा आकडा भाजपला गाठता आला नाही. त्यामुळे भाजपने खेळी करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार पक्षासह अजित पवार यांचा एक, शिंदे सेना, महानगर विकास आघाडीसह एका अपक्षाला सोबत घेत एकूण 45 सदस्यांसह सत्तेचे गणित जुळवलं.

.jpeg)

About The Author
Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.


Comment List