डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा विचार वर्तनात आणला पाहिजे :  प्रविण डाळींबकर

डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा विचार वर्तनात आणला पाहिजे :  प्रविण डाळींबकर


छत्रपती संभाजीनगर:- आपण आजवर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना  भावनिकदृष्ट्या स्विकारले ते गरजेचेही होते पण, आता बाबासाहेबांचा विचार वर्तनात आणला पाहिजे असे मत सिनेअभिनेते प्रविण डाळींबकर यांनी व्यक्त केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयात मेत्ता संघाच्या वतीने मूकनायक दिनानिमित्त आयोजित 'आंबेडकरी संवादशास्त्र परिषदे'त ते बोलत होते. 

    ही परिषद दोन सत्रात आयोजित केली होती. उद्घाटनाच्या सत्राचा विषय ‘आंबेडकरी पत्रकारिता : प्रतिकार, प्रतिनिधित्व आणि सामाजिक न्यायासाठीचे संवादशास्त्र’ हा होता. या पहिल्या सत्राचे अध्यक्ष  डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद हिरोडे होते. सत्रात  आंबेडकरी भूमिका  मांडता यावी यासाठी स्वतंत्र मिडिया असला पाहिजे असे प्रतिपादन राहूल पगारे यांनी त्यांच्या बातमी मागील सांस्कृतिक राजकारण या विषयावर बोलताना केले.  
 डॉ.स्वर्णमाला मस्के यांनी बहुजन महिलांचे मुख्य प्रवाही पत्रकारितेतील प्रतिनिधीत्व नगण्य असल्याचे आकडेवारीसह स्पष्ट केले.  
पत्रकारितेचे अभ्यासक यशवंत भंडारे यांनी आंबेडकरांच्या पत्रकारितेचे स्वरूप सांगत आज बहुसंख्याकाचे मुलभूत प्रश्न मांडणारी पत्रकारिता होत नाही, त्यामुळे आंबेडकराच्या पत्रकारितेला अनुसरून पत्रकारिता करण्याची आवश्यकता असल्याचे मत मांडले.  
ज्येष्ठ पत्रकार शांतीलाल गायकवाड यांनी, मुख्य प्रवाही माध्यमे बदलास  अनुकूल नसतीलही मात्र आपण स्वतः मध्ये परिवर्तन घडवले पाहिजे असे मत मांडले.
प्रास्ताविक अनुरूप खिल्लारे यांनी केले. सत्राचे सूत्रसंचलन  डॉ. राहूल बचाटे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. संजय पाईकराव यांनी मानले.

दुसऱ्या सत्राचा विषय ‘न्यू मिडिया, कला आणि लोकसंवाद’ हा होता.  या सत्राचे अध्यक्ष यशवंत भंडारे हे होते. या सत्रात संजना खंदारे यांनी वर्तमानात मुख्य प्रवाही पत्रकारितेचा स्तर ढासळलेला असून नवमाध्यमे चांगले काम करत आहेत. तेंव्हा येणाऱ्या काळात  डिजिटल मिडिया तथा नवमाध्यमेच बहुजन महिलांच्या हितासाठी उपयुक्त ठरेल, शिवाय मुख्य प्रवाही माध्यमांचे स्थान घेतील तेंव्हा मुख्य प्रवाही माध्यम दुय्यम ठरतील असे मत व्यक्त केले. 
प्रा. डॉ. संजय मोहड यांनी आंबेडकरी जलसे,  त्यांचा इतिहास, जलस्याचे महत्त्व, जलस्यातील विचारांची आंबेडकरांच्या तत्वज्ञानाशी असलेली सुसंगती आजच्या गीतांमधून येत नाही.   'जल'सा  (पाण्यासारखा)  वह जलसा' अशी जलस्याची व्याख्या सांगत आंबेडकरी गीत संगीतात वामनदादांच्या रचनांचे महत्त्व स्पष्ट केले. IMG-20260202-WA0251
प्रा. डॉ. प्रकाश शिरसाठ यांनी बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः कला  शिकण्यासोबतच कलेचा संवादशास्त्राच्या अनुषंगाने पुरस्कार करण्यावर भर दिला. त्यांनी स्वतः  चित्रकला, व्हायोलिन शिकण्याचा जो प्रयत्न केला यातून  बाबासाहेब चळवळीसाठी कला हे अत्यंत महत्त्वाचे माध्यम मानत असल्याचे  स्पष्ट होते. तसेच मानवी मेंदूची मशागत करणे हेच मानवाच्या अस्तित्वाचे ध्येय असायला पाहिजे हाच ब बाबासाहेबांचा विचार होता असे मत मांडले. 
  डॉ. वैशाली बोदेले यांनी लोककलेची आंबेडकरी चळवळीतील भूमिका स्पष्ट केली. डॉ. किशोर वाघ यांनी प्रभुत्ववादी राजकारणाला आंबेडकरी गीत-संगीत हे असहमतीदर्शक असून समता प्रस्थापनेचा त्यात आग्रह असल्याची मांडणी केली.  सत्राचे सूत्रसंचलन रत्नदीप रगडे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. अर्जुन पटेकर यांनी मानले.
परिषद यशस्वी करण्यासाठी डॉ. गौतम पटेकर, गोविंद मोरे, सुमेध नरवडे,  यांनी परिश्रम घेतले.   परिषदेला मोठ्या संख्येने संशोधक, विद्यार्थी व शहरातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

IMG-20251117-WA0399

आपली शाळा, महविद्यालय,संस्था व संघटना यांच्या बातम्या, फोटो 7588005002 या नंबर वर व्हॉट्स ॲप वर पाठवा....कथा,कविता,पुस्तक परीक्षण, वैचारिक लेखन देखील उपरोक्त नंबर पाठवावे

WhatsApp Image 2024-10-23 at 8.06.44 PM

WhatsApp Image 2024-09-25 at 8.09.53 PM(1)

Tags:

About The Author

Maharashtra Janshakti News Picture

Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

प्रा. विश्वास गव्हाणे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रा. विश्वास गव्हाणे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार
पैठण :-( प्रतिनिधी ) बी. द.चेंज फाउंडेशन तर्फे दिला जाणारा आदर्श शिक्षक पुरस्कार 2026 प्रतिष्ठान महाविद्यालयातील प्रा. विश्वास सयाजीराव गव्हाणे...
डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा विचार वर्तनात आणला पाहिजे :  प्रविण डाळींबकर
निधन वार्ता : लक्ष्मीबाई सौंगडे यांचे निधन
अपघाताआधी अजितदादांशी मी दोन तास बोललो, मी अनेक गोष्टी सांगेल पण…; देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने खळबळ तर शशिकांत शिंदे यांनी अजित दादांची शपथ घेऊन सांगितले........
बजेटमुळे काय स्वस्त ? काय महाग ? प्रत्येक जिल्ह्यात मुलींसाठी वसतिगृहे, नवीन जलमार्ग, मेडिकल हब, गाईड ट्रेनिंग सेंटर आणि बरेच काही; संपूर्ण बजेट समजून घ्या या एकाच बातमी मधून
मोठी बातमी, मालेगाव पालिकेत भाजप आणि काँग्रेस आले एकत्र, गट सुद्धा केला स्थापन.......
महापौर निवडणुकीत तुफान राडा, काँग्रेस विरुद्ध MIM चे नगरसेवक भिडले, बांगड्या फेकून मारल्या
Join Us on Whatsapp