छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य हे शोषणाविरुद्धचे मानवी मूल्य : प्रा. डॉ. उमेश बगाडे यांचे प्रतिपादन 'शिवराय का आठवावे?' : प्रा. डॉ. उमेश बगाडे यांनी उलगडले शिवरायांच्या स्वराज्याचे समाजशास्त्रीय पदर
छत्रपती संभाजीनगर:- छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एका कालखंडाचे राजे नसून, ते एका प्रगत सामाजिक आणि आर्थिक विचारसरणीचे प्रवर्तक होते. त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आयोजित 'शिवराय का आठवावे' या ऑनलाईन व्याख्यानातून ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. उमेश बगाडे यांनी महाराजांच्या धोरणांचे अत्यंत चिकित्सक आणि विविधांगी विश्लेषण केले.
निमित्त होते, देवगिरी महाविद्यालय (छत्रपती संभाजीनगर), प्रतिष्ठान महाविद्यालय (पैठण), संत तुकाराम महाविद्यालय (कन्नड) यांच्या संयुक्त इतिहास विभाग आणि लोकसंवाद फाऊंडेशन (छत्रपती संभाजीनगर), यांच्या वतीने आयोजित 'शिवराय का आठवावे' या ऑनलाईन व्याख्यानाचे. ३ एप्रिल २०२६ रोजी संपन्न झालेल्या या कार्यक्रमात डॉ. उमेश बगाडे यांनी शिवरायांच्या धोरणांचे विविधांगी आणि समाजशास्त्रीय पैलू उलगडले.
आपल्या अभ्यासपूर्ण मांडणीत डॉ. उमेश बगाडे यांनी वारकरी संप्रदाय आणि शिवराय यांच्यातील सुसंगती अत्यंत नावीन्यपूर्ण पद्धतीने मांडली. ते म्हणाले की, "संतांनी जो समतेचा विचार आध्यात्मिक स्तरावर मांडला, त्याला शिवरायांनी स्वराज्याच्या रूपाने राजकीय आणि सामाजिक अधिष्ठान मिळवून दिले." अठरापगड जातींना एकत्र करून स्वराज्याची निर्मिती करणे, ही केवळ लष्करी गरज नव्हती तर तो एक यशस्वी सामाजिक समतेचा प्रयोग होता, असे त्यांनी नमूद केले.
व्याख्यानाचा मुख्य भर महाराजांच्या शेतकरी आणि न्यायविषयक धोरणांवर होता. डॉ. उमेश बगाडे यांनी विश्लेषणात्मक मांडणी करताना सांगितले की, महाराजांनी तत्कालीन जाचक सरंजामशाही व्यवस्था मोडीत काढून रयतेचे थेट राज्य निर्माण केले. त्यांच्या प्रशासनाचा केंद्रबिंदू हा शेतकरी होता. 'रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका' हा त्यांचा आदेश केवळ लष्करी शिस्त नसून ती प्रजेप्रती असलेल्या संवेदनशीलतेची आणि सहिष्णूतेची सर्वोच्च पराकाष्ठा होती.
किल्ल्यांच्या बांधकामात आणि त्यांच्या संरक्षणात महादेव कोळी समाजासह सर्वच कष्टकरी समाजाचे जे योगदान राहिले, त्याकडे डॉ. उमेश बगाडे यांनी विशेष लक्ष वेधले. आंग्रे घराण्याने उभारलेले प्रभावी नौदल हे भारताच्या सागरी सीमा सुरक्षित करणारे पहिले स्वावलंबी पाऊल होते. विशेषतः 'खरात प्रकरणा'चा ऐतिहासिक दाखला देत, महाराजांनी कर्मकांडांना झुगारून देऊन विवेकी आणि न्याय्य राज्याची निर्मिती कशी केली, यावर त्यांनी प्रकाश टाकला.
परकीय व्यापारावर अंकुश ठेवण्यासाठी मिठावर लावलेला कर असो वा दक्षिण दिग्विजयावेळी राजकीय लवचिकता दाखवून केलेली गोवळकोंडा भेट असो; शिवरायांचे प्रत्येक पाऊल हे स्वराज्याच्या दीर्घकालीन हितासाठी होते. त्यांचे महिलांविषयक धोरण हे आजही आधुनिक जगासाठी नैतिकतेचा मानदंड असल्याचे डॉ. बगाडे यांनी अधोरेखित केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. शरद गावंडे यांनी आपल्या भाषणात या व्याख्यानाच्या औचित्यावर भाष्य केले. शिवरायांचे विचार आजच्या पिढीपर्यंत वस्तुनिष्ठ आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून पोहोचवणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. या उपक्रमासाठी प्रो. प्राचार्य रवी पाटील आणि प्रो. प्राचार्य जी. एस. सोनकांबळे यांचे विशेष सहकार्य लाभले. प्रमुख उपस्थितीमध्ये डॉ. गणेश मोहिते उपप्राचार्य देवगिरी महाविद्यालय छत्रपती संभाजी नगर डॉ. चेतना सोनकांबळे डॉ.मुकेश भोगे डॉ. अमोल मस्के प्रस्ताविक डॉ. राजेश करपे यांनी केले तर आभार डॉ. सुवर्णा पाटील यांनी मानले सूत्रसंचालन डॉ. महेश रोटे यांनी केले कार्यक्रमाच्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. बाळासाहेब टेकाळे प्रा. राजाराम जेवे, डॉ सुभाष सूर्यवंशी, डॉ. उमेश नवल, डॉ. दिगंबर जाधव, प्रा. पायल सूर्यवंशी, प्रा. रेवनाथ मस्के यांनी सहकार्य केले तसेच तीनही महाविद्यालयातील प्राध्यापकांनी सहकार्य केले आणि उपस्थिती दर्शवली महाविद्यालयांचे प्राध्यापक, इतिहास संशोधक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
.jpeg)
आपली शाळा, महविद्यालय,संस्था व संघटना यांच्या बातम्या, फोटो 7588005002 या नंबर वर व्हॉट्स ॲप वर पाठवा....कथा,कविता,पुस्तक परीक्षण, वैचारिक लेखन देखील उपरोक्त नंबर पाठवावे

About The Author
Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.


Comment List