जितेंद्र लक्ष्मणराव बोडखे : एका चारित्र्य संपन्न शिक्षकाची सेवानिवृत्ती
ज्ञानदान हे सर्वात पवित्र कार्य मानले जाते. या ज्ञानसेवेचे अखंड व्रत जपणारे, देवगिरी महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर येथील भौतिकशास्त्र विषयाचे आदरणीय शिक्षक श्री. जितेंद्र लक्ष्मण बोडखे सर आज ३२ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्तीच्या उंबरठ्यावर उभे आहेत. हा क्षण आनंदाचा असला तरी भावनांनी ओथंबलेलाही आहे.
सरांनी आपल्या अध्यापनातून केवळ सूत्रे आणि सिद्धांत शिकवले नाहीत, तर विज्ञानाकडे पाहण्याची दृष्टी दिली. त्यांच्या साध्या, सोप्या आणि विद्यार्थ्याभिमुख शिकवण्याच्या पद्धतीमुळे भौतिकशास्त्रासारखा कठीण विषयही विद्यार्थ्यांना आवडू लागला. प्रयोगशीलता, शिस्त, वेळेचे महत्त्व आणि जिज्ञासा या गुणांची रुजवण त्यांनी विद्यार्थ्यांच्या मनात केली.
“शिक्षकाचे बाह्य सौंदर्य कसे असावे, याचे उत्तम उदाहरण म्हणजे जितेंद्र बोडके सर होय. साधेपणा, नीटनेटकेपणा आणि प्रसन्न व्यक्तिमत्त्व ही त्यांच्या बाह्य रूपाची ओळख होती. स्वच्छ वेशभूषा, आत्मविश्वासपूर्ण देहबोली आणि विद्यार्थ्यांशी बोलताना दिसणारा आपुलकीचा भाव यामुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व सर्वांना भावत असे. त्यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना आदर, विश्वास आणि प्रेरणा मिळत असे. म्हणूनच त्यांचे बाह्य सौंदर्य हे केवळ रूपापुरते मर्यादित नसून, ते त्यांच्या स्वभावातील सुसंस्कृततेचे आणि शिक्षकधर्मातील प्रामाणिकतेचे प्रतिबिंब होते.”
बोडखे सरांचे व्यक्तिमत्त्व अत्यंत शांत, संयमी आणि प्रेरणादायी आहे. प्रत्येक विद्यार्थ्याकडे त्यांनी आपल्या मुलाप्रमाणे पाहिले. अडचणीत असलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे, त्यांना आत्मविश्वास देणे आणि यशाच्या वाटेवर नेणे हे त्यांच्या जीवनाचे ध्येय होते. अनेक विद्यार्थ्यांनी त्यांच्या मार्गदर्शनातून उज्ज्वल भविष्य घडवले, हीच त्यांच्या कार्याची खरी पावती आहे.
संस्थेच्या विकासातही सरांचा मोलाचा वाटा राहिला. प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा आणि कार्यतत्परता यांचे उत्तम उदाहरण म्हणजे बोडखे सर. त्यांच्या कार्यामुळे संस्थेची शैक्षणिक परंपरा अधिक समृद्ध झाली.
सरांच्या कार्याचा आलेख पाहताना त्यांनी केलेले अथक परिश्रम, त्याग आणि ज्ञानदानाच्या पवित्र कार्यात दिलेले योगदान स्पष्टपणे दिसते प्रा. जितेंद्र बोडखे यांनी विद्यार्थी घडवण्याच्या प्रक्रियेत, मार्गदर्शन करण्याच्या त्यांच्या कार्यक्षमतेमुळे अनेक विद्यार्थ्यांच्या जीवनाला नवी दिशा मिळाली आहे. एक शिक्षक
म्हणून त्यांनी विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकातील ज्ञानच दिले नाही तर त्यांच्यामध्ये विचारशीलता, सृजनशीलता आणि मानवता यांचे बिजारोपण केले आहे.
महाविद्यालयातील प्रत्येक उपक्रमात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. यामध्ये JEE NEET CELL चे प्रवेश प्रक्रियेत शाळा भेटी चे समिती प्रमुख म्हणून त्यांच्या मार्गदर्शनाखाली 122 शाळांना भेटी व 2500 विद्यार्थी संपर्क केलेला आहे. मुलांच्या वस्तीगृह समितीचे 8 वर्ष सदस्य,
स्वच्छता समिती असो वा बांधकाम समिती, महाविद्यालयाची Maintance समिती,JEE NEET CELL मधील Doubt Session असो, सगळी कामे अतिशय चोखपणे केलेली आहेत. JEE NEET CELL चे काम करून नियमित तासिका घेणारे एकमेव शिक्षक आहेत
केवळ शिक्षक म्हणून नव्हे तर मार्गदर्शक, सल्लागार आणि प्रेरणास्थान म्हणून त्यांनी विद्यार्थ्यांना घडवले. अनेक विद्यार्थी आज विविध क्षेत्रांत यशस्वी झाले असून त्यामागे सरांचे संस्कार आणि मार्गदर्शन आहे, हीच त्यांच्या कार्याची खरी पावती आहे.
निवृत्ती हा शेवट नसून नव्या प्रवासाची सुरुवात असते. आज औपचारिक सेवेतून ते निवृत्त होत असले तरी त्यांनी दिलेले ज्ञान, मूल्ये आणि प्रेरणा कायम आमच्या सोबत राहतील. त्यांच्या कार्याचा ठसा आमच्या मनावर सदैव उमटलेला राहील.
आज त्यांचा गौरव करताना आम्हाला मनस्वी आनंद आणि अभिमान वाटतो.कामात राम आहे आणि सर्वांनी खूप शिकले पाहिजे असे सांगून सामान्यांच्या शिक्षणासाठी व आरोग्यासाठी आपली संपूर्ण हयात या दोन मूलभूत सुविधांसाठी व्यतीत करणारा प्राध्यापक म्हणून जितेंद्र बोडखे सरांची ओळख आहे.
शिवरायांचा आठवावा साक्षेप' म्हणजे शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेसाठी केलेला प्रयत्न, जिद्द, कष्टाळू वृत्ती आणि सूक्ष्म नियोजनाचे स्मरण करणे होय.
अशी ध्येयवादी माणसं खूप कमी असतात ते शोधूनही सापडत नाहीत त्यांच्यासाठी त्यांचा गौरव सोहळा कार्यकृती आदरभाव असतो. माझा एक उत्तम कुशल शिक्षक मार्गदर्शक मित्र प्राध्यापक जितेंद्र बोडके यांचा निरोप समारंभ कार्यक्रम होत आहे ही बाब निश्चितच आपल्या सर्वांच्यासाठी आनंददायी आहे. आपले शैक्षणिक कामकाज करताना त्यांनी वेळेचे बंधन कधीच पाळले नाही. घड्याळाकडे कधीच लक्ष दिले नाही , त्यांचे कार्य अत्यंत कौतुकास्पद आहे सरस्वतीच्या मंदिराकडे वाटचाल करणारा प्रवासी विद्यार्थी हे दैवत म्हणून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ध्यास घेतलेला एक ध्येयवेढा शिक्षक आणि स्नेह मार्गाने स्नेह जोडी, स्नेह वाटत फिरणारे प्रेमळ स्नेही ही त्यांची ओळख आहे . त्यामुळे या कुटुंब वत्सल स्नेह मार्गी शिक्षकाचे जीवन एक यशोगाथा बनली आहे ती त्यांच्या सुविधे पत्नी आमच्या वहिनीमुळे व त्यांच्या जोड सहकार्यामुळे हे कुटुंब आज संपन्न समाधानी व समृद्ध बनलेले आहे या त्यांच्या दोन्ही मुलांचा सिंहाचा वाटा आहे.मित्रत्वाचं नातं निर्माण करणे व ते टिकविणे हा बोडके सरांचा स्वभाव आहे त्यासाठी मन अत्यंत सर्जनशील व सुसंस्कृत असावे लागते. ते त्यांच्याकडे आहे प्रत्यक्ष भेटीच्या वेळी बऱ्याच वेळा एकमेकांच्या कौटुंबिक बाबतीतही चर्चा व्हायची.सरांच्या सहवासात सकारात्मक दृष्टिकोन, प्रामाणिकपणा ,चारित्र्याचा सदैव आदर्श आम्हाला मिळाला. सरांची सर्वांशीच वागणूक आपुलकीची ,जिव्हाळ्याची तसेच ममतेची आहे त्यामुळे सर सर्वांच्या मनात कायम राहतील कारण सरांनी आयुष्यभर ज्या तत्त्वाने काम केले, करीत राहिले तसेच त्यांनी शिक्षकी पेशाला व्यावसायिकतेचे स्वरूप दिले नाही.त्याचे अनुसरण सहकारी व विद्यार्थी करतील अशी अपेक्षा बाळगतो.
बोडखे सरांमध्ये वाखाण्यासारखे अनेक गुण आहेत माणसे जोडणे हा सरांचा छंद आहे अत्यंत शिस्तप्रिय , मितभाषी पण अत्यंत मृदू आणि गोडवाणी, समाजनिष्ठा, कार्य तत्परता, कोणालाही न दुखावता प्रेमाने काम करून घेण्याची हातोटी, समोरच्या व्यक्तीचा योग्य आदर, कामाचा प्रचंड आवाका, संघटन कौशल्य, शांत स्वभाव, कुशल नेतृत्व, दूरदृष्टी आणि अचूक निर्णय क्षमता . सर अजातशत्रू आहेत. त्यामुळे सरांचा मोजकाच पण कायमस्वरूपी मित्रपरिवार आजही पहावयास मिळतो. विद्यार्थ्यांची आस्थेवाईकपणे चौकशी करून त्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्या सोडवण्याला सरांनी प्राधान्य दिले एवढेच नाही तर गरजू, गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना वेळोवेळी भरीव आणि आर्थिक मदत, कोणतीही अपेक्षा न ठेवता केलेली आहे व अजूनही करत आहेत.
अशा समर्पित आणि मानवतावादी शिक्षकाचा समाजाला अभिमान आहे. यांचे कार्य इतर शिक्षकांसाठी प्रेरणादायी असून, शिक्षण क्षेत्रात मानवी मूल्यांचे महत्त्व अधोरेखित करणारे आहे.
आज निरोप देताना मन कृतज्ञतेने भरून आले आहे. सरांचा सहवास, मार्गदर्शन आणि प्रेमळ वागणूक आम्हाला सदैव आठवत राहील. कारण आता असे शिक्षक होणे नाही. निवृत्तीनंतरचे आयुष्य आनंदी, निरोगी आणि समाधानाने भरलेले जावो, हीच मनःपूर्वक शुभेच्छा.
सर, आपण दिलेले ज्ञान आणि संस्कार आमच्या आयुष्याचा दीपस्तंभ राहतील. आपल्या पुढील जीवनप्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा!
डॉ बाळासाहेब शिंदे
आदर्श शिक्षक महाराष्ट्र शासन
देवगिरी महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर
8080239092

आपली शाळा, महविद्यालय,संस्था व संघटना यांच्या बातम्या, फोटो 7588005002 या नंबर वर व्हॉट्स ॲप वर पाठवा....कथा,कविता,पुस्तक परीक्षण, वैचारिक लेखन देखील उपरोक्त नंबर पाठवावे

.jpeg)
About The Author
Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.


Comment List