प्रा. डॉ. किशोर वाघ यांना “राष्ट्रसंत गाडगेबाबा राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार – 2026” प्रदान

प्रा. डॉ. किशोर वाघ यांना “राष्ट्रसंत गाडगेबाबा राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार – 2026” प्रदान

 

परळी (प्रतिनिधी): राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य आणि प्रेरणादायी कार्यक्रमात प्रा. डॉ. किशोर वाघ यांना “राष्ट्रसंत गाडगेबाबा राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार – 2026” प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार सोहळा परळी येथील स्व. गोपीनाथराव मुंडे सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

या कार्यक्रमाला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस, डॉ. बाबासाहेब आंबेडकर ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटर (बार्टी) चे सहाय्यक आयुक्त आयु. विशाल लोंढे, क्रांतिकारी कीर्तनकार ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज वाबळे तसेच कार्यक्रमाचे आयोजक पृथ्वीराज शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन प्रा. डॉ. किशोर वाघ यांचा गौरव करण्यात आला. समाजकार्य, शैक्षणिक क्षेत्रातील योगदान आणि सामाजिक प्रबोधनासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना हा राज्यस्तरीय सन्मान प्रदान करण्यात आला.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या समाजप्रबोधन, स्वच्छता आणि समता विचारांची आठवण करून दिली. समाजात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्यासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे, असे आवाहनही करण्यात आले.

पुरस्कार स्वीकृत करताना प्रा. डॉ. किशोर वाघ यांनी हा सन्मान आपल्या सहकाऱ्यांना, विद्यार्थ्यांना आणि समाजकार्याच्या वाटचालीत साथ देणाऱ्या सर्वांना अर्पण केला. हा पुरस्कार अधिक जबाबदारीची जाणीव करून देणारा असल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाचे आयोजन शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. मोठ्या संख्येने नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि विद्यार्थी उपस्थित होते.

IMG-20240814-WA0257

आपली शाळा, महविद्यालय,संस्था व संघटना यांच्या बातम्या, फोटो 7588005002 या नंबर वर व्हॉट्स ॲप वर पाठवा....कथा,कविता,पुस्तक परीक्षण, वैचारिक लेखन देखील उपरोक्त नंबर पाठवावे

WhatsApp Image 2024-07-19 at 8.11.11 PM

IMG-20251117-WA0399

WhatsApp Image 2024-10-23 at 8.06.44 PM

WhatsApp Image 2024-09-25 at 8.09.53 PM(1)

Tags:

About The Author

Maharashtra Janshakti News Picture

Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

उच्च शिक्षणातील जातीभेदाविरुद्ध छत्रपती संभाजीनगरात एल्गार :  राजकुमार बडोले फाउंडेशन आणि लॉर्ड बुद्धा टीव्ही यांच्या संयुक्त पुढाकारातून ‘यूजीसी अधिनियम 2026’वर महाचर्चा चे आयोजन उच्च शिक्षणातील जातीभेदाविरुद्ध छत्रपती संभाजीनगरात एल्गार : राजकुमार बडोले फाउंडेशन आणि लॉर्ड बुद्धा टीव्ही यांच्या संयुक्त पुढाकारातून ‘यूजीसी अधिनियम 2026’वर महाचर्चा चे आयोजन
    छत्रपती संभाजीनगर : देशभरातील विद्यापीठे आणि उच्च शिक्षण संस्थांमध्ये अनुसूचित जाती, जमाती आणि ओबीसी विद्यार्थ्यांवर होणाऱ्या उघड व छुप्या
जितेंद्र लक्ष्मणराव बोडखे : एका चारित्र्य संपन्न शिक्षकाची सेवानिवृत्ती
मराठवाडा मूर्तीने समृद्ध परिपूर्ण असणारा भूप्रदेश -डॉ. माया पाटील 
प्रा. डॉ. किशोर वाघ यांना “राष्ट्रसंत गाडगेबाबा राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार – 2026” प्रदान
संत साहित्याच्या केंद्रस्थानी मानवतावाद -डॉ. विजयकुमार फड 
जमाते इस्लामी हिंद कडून जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा ढोरेगावला मौल्यवान पुस्तकांची भेट....
विवेकानंद शिक्षण संस्था संचलित मराठा हायस्कूल, चौराहा येथे थोर समाजसुधारक संत गाडगे महाराज यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी
Join Us on Whatsapp