सानिया मिर्झाने सोडले भारताचे नागरिकत्व ? मग ती कुठे राहते सविस्तर.......
मुंबई : भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा ही टेनिस कोर्टवरून निवृत्त झाली असली तरी तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आणि नागरिकत्वाबद्दल सोशल मीडियावर अजूनही चर्चा सुरू असते. तिने शोएब मलिकशी लग्न केले होते, नंतर त्यांचा घटस्फोट झाला. ती दुबईत देखील स्थायिक झाली. त्यामुळे एक प्रश्न हमखास विचारला जातो, तो म्हणजे सानिया मिर्झा अजूनही ‘भारतीय’ आहे का? सानिया मिर्झाचा पाकिस्तानी खेळाडू शोएब मलिकशी घटस्फोट होऊन दोन वर्षे झाली असली तरी, टेनिस स्टार सानिया अजूनही भारतीय पासपोर्ट वापरते का याबद्दलही प्रश्न उपस्थित होत असतात.
तिच्या नागरिकत्वाबद्दल लोकांना अजूनही प्रश्न पडतात. तर त्याचे थेट, साधे, सोपे उत्तर आहे की हो, सानिया आजही भारतीय नागरिक आहे. तिच्याकडे भारतीय पासपोर्ट असून तिने कधीच दुस-या देशाच्या नागरिकत्वासाठी अर्ज केलेला नाही. सानियाने देखील अनेक मुलाखतींमध्ये हे स्पष्टपणे सांगितले आहे की ‘मी भारतीय आहे आणि शेवटच्या श्वासापर्यंत भारतीयच राहीन.’
भारताची स्टार टेनिस खेळाडू सानिया मिर्झा गेल्या अनेक वर्षांपासून दुबईमध्ये राहत आहे. तिच्याकडे यूएईचा ‘गोल्डन व्हिसा’ आहे, जो १० वर्षांचा निवास परवाना आहे. पण बरेच लोक याला नागरिकत्व समजतात, मात्र असे नाही. या परमीटमुळे तिला फक्त तिथे राहण्याची आणि व्यवसाय करण्याची परवानगी मिळते. सानिया दुबईला तिचे ‘दुसरं घर’ मानते, परंतु तिचे हृदय आणि नागरिकत्व नेहमीच भारतातच राहिले आहे. सानिया मिर्झा दुबईमध्ये एक अकादमी चालवते आणि ती दुबई स्पोर्टस्ची राजदूत देखील आहे.
२०१० साली पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिकशी लग्न केल्यानंतरही सानियाने तिची ओळख बदलली नाही. भारतीय कायद्यानुसार, दुहेरी नागरिकत्वाला परवानगी नाही. जर सानियाने पाकिस्तानी नागरिकत्व स्वीकारलं असतं तर तिला तिचा भारतीय पासपोर्ट परत करावा लागला असता, पण तिने तसं कधीच केलं नाही. तिने नेहमीच आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय ध्वजाला, तिरंग्याला सन्मान मिळवून दिला. पाकिस्तानी खेळाडू शोएबशी लग्न झाल्यानंतरही ती भारतासाठी खेळत राहिली.
_(cropped).jpg)

.jpeg)
About The Author
Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.


Comment List