राणे पिता पुत्रांनी केली महायुतीची घोषणा आणि जागावाटप सुद्धा पण भाजपाच्या नाराज 43 पदाधिकाऱ्यांनी दिले तातडीने राजीनामे

राणे पिता पुत्रांनी  केली महायुतीची घोषणा आणि जागावाटप सुद्धा पण भाजपाच्या नाराज 43 पदाधिकाऱ्यांनी दिले तातडीने राजीनामे

सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर होताच राजकीय वातावरण तापले आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि खासदार नारायण राणे यांनी महायुतीच्या माध्यमातून एकत्रित निवडणूक लढवण्याची घोषणा केली. यानंतर अवघ्या काही तासांतच त्यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजप, शिंदे गटाची शिवसेना आणि अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला.
मात्र, या जागा वाटपाच्या फॉर्म्युल्याला भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. फॉर्म्युला जाहीर झाल्यानंतर लगेचच ओरोस मंडळाचे अध्यक्ष आनंद उर्फ भाई सावंत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. राजीनाम्यात त्यांनी म्हटले आहे की, “सध्याच्या राजकीय परिस्थितीत या पदावर राहून काम करणे मला उचित वाटत नाही. माझा कोणत्याही नेत्यावर वैयक्तिक नाराजी नाही, तरीही हा राजीनामा त्वरित स्वीकारावा.”

आनंद सावंत यांच्या राजीनाम्यानंतर मोठ्या प्रमाणात नाराजीच्या साखळी प्रतिक्रिया दिसून आल्या. ओरोस मंडळातील ओबीसी जिल्हाध्यक्ष महेश उर्फ छोटू पारकर, जिल्हा कार्यकारणी सदस्य लॉरेन्स मान्येकर, उदय कुमार जांभवडेकर, ओरोस मंडळ उपाध्यक्ष आबा मुंज, जिल्हा युवा मोर्चा उपाध्यक्ष जयेश चिंचळकर, अनुसूचित जाती मोर्चा मंडळ अध्यक्ष सुनील जाधव यांच्यासह बूथ अध्यक्ष, शक्ति केंद्रप्रमुखांसह एकूण ४३ पदाधिकाऱ्यांनी आपापल्या पदांचे राजीनामे दिले आहेत. हे राजीनामे भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांना सादर करण्यात आले असून, पदाधिकाऱ्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे याची माहिती दिली आहे.
नाराजीचे कारण आणि पार्श्वभूमीखासदार नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुती एकत्र येऊन निवडणुका लढवणार असल्याचे आजच जाहीर झाले. जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यामुळे भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. अनेकांना वाटते की, या फॉर्म्युल्यात भाजपच्या हितांचे रक्षण झाले नाही, ज्यामुळे पक्षातील नाराजीचे नाट्य उघड झाले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ही घटना महायुतीच्या एकतेच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी ठरली आहे. निवडणुकी पूर्वीच पक्षांतर्गत असंतोष वाढल्याने पुढील राजकीय घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

IMG-20251117-WA0399

WhatsApp Image 2024-09-25 at 8.09.53 PM(1)

WhatsApp Image 2024-10-23 at 8.06.44 PM

Tags:

About The Author

Maharashtra Janshakti News Picture

Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

उच्च शिक्षणातील जातीभेदाविरुद्ध छत्रपती संभाजीनगरात एल्गार :  राजकुमार बडोले फाउंडेशन आणि लॉर्ड बुद्धा टीव्ही यांच्या संयुक्त पुढाकारातून ‘यूजीसी अधिनियम 2026’वर महाचर्चा चे आयोजन उच्च शिक्षणातील जातीभेदाविरुद्ध छत्रपती संभाजीनगरात एल्गार : राजकुमार बडोले फाउंडेशन आणि लॉर्ड बुद्धा टीव्ही यांच्या संयुक्त पुढाकारातून ‘यूजीसी अधिनियम 2026’वर महाचर्चा चे आयोजन
    छत्रपती संभाजीनगर : देशभरातील विद्यापीठे आणि उच्च शिक्षण संस्थांमध्ये अनुसूचित जाती, जमाती आणि ओबीसी विद्यार्थ्यांवर होणाऱ्या उघड व छुप्या
जितेंद्र लक्ष्मणराव बोडखे : एका चारित्र्य संपन्न शिक्षकाची सेवानिवृत्ती
मराठवाडा मूर्तीने समृद्ध परिपूर्ण असणारा भूप्रदेश -डॉ. माया पाटील 
प्रा. डॉ. किशोर वाघ यांना “राष्ट्रसंत गाडगेबाबा राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार – 2026” प्रदान
संत साहित्याच्या केंद्रस्थानी मानवतावाद -डॉ. विजयकुमार फड 
जमाते इस्लामी हिंद कडून जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा ढोरेगावला मौल्यवान पुस्तकांची भेट....
विवेकानंद शिक्षण संस्था संचलित मराठा हायस्कूल, चौराहा येथे थोर समाजसुधारक संत गाडगे महाराज यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी
Join Us on Whatsapp