भिका-याचे ३ बंगले, कार आणि व्याजाचा धंदा, पोलिसही चक्रावले

भिका-याचे ३ बंगले, कार आणि व्याजाचा धंदा, पोलिसही चक्रावले

आपण अनेकदा रस्त्यावर बसलेल्या भिका-यांकडे सहानुभूतीने पाहतो आणि त्यांना चार दोन पैसे देतो. मात्र, मध्य प्रदेशातील इंदूरमधून समोर आलेली बातमी वाचून तुमचा भिका-यांकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून जाईल. सराफा बाजारात गेली अनेक वर्षे भीक मागणा-या मांगीलाल नावाच्या भिका-याचा रॉयल थाट उघड झाला असून, त्याच्याकडे कोट्यवधींची मालमत्ता असल्याचे समोर आले आहे.
महिला व बालविकास विभागाने इंदूरमध्ये राबवलेल्या भिक्षावृत्ती निर्मूलन मोहिमेत मांगीलालची पोलखोल झाली. दिसायला अत्यंत गरीब आणि हतबल वाटणा-या मांगीलालकडे शहरात एक-दोन नव्हे तर तब्बल ३ पक्की घरे आहेत. त्याच्याकडे भगतसिंग नगर भागात १६ बाय ४५ फुटांचे तीन मजली आलिशान घर, शिवनगरमध्ये ६०० स्क्वेअर फुटांचे दुसरे पक्के घर आणि अलवासमध्ये १० बाय २० फुटांचे १-बीएचके घर, जे त्याला अपंगत्वाच्या कोट्यातून मिळाले होते, इतकी स्थावर संपत्ती आहे. इतकेच नाही, तर या धनकुबेर भिका-याकडे ३ रिक्षा आहेत, ज्या तो भाड्याने चालवतो. धक्कादायक म्हणजे, त्याच्याकडे एक डिझायर कार असून ती चालवण्यासाठी त्याने चक्क ड्रायव्हर देखील ठेवला आहे.
व्यापा-यांना व्याजाने देतो पैसेमांगीलालची मोडस ऑपरेंडी पाहून अधिकारीही अवाक झाले. पाठीवर बॅग आणि हातात बूट घेऊन लोकांची सहानुभूती मिळवणारा हा भिकारी दिवसाला ५०० ते १००० रुपये भीक मिळवत असे. चौकशीत त्याने कबूल केले की, भीक मागून जमा झालेले पैसे तो सराफा बाजारातील काही व्यापा-यांना व्याजाने देतो. तो दररोज किंवा साप्ताहिक तत्त्वावर कर्ज वाटप करायचा आणि रोजचे व्याज वसूल करण्यासाठी पुन्हा भिका-याच्या वेशात सराफा बाजारात फिरायचा.
इंदूरमध्ये ६,५०० भिका-यांचा सुळसुळाटजिल्हा कार्यक्रम अधिकारी रजनीश सिन्हा यांनी दिलेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी २०२४ पासून इंदूरला भिक्षावृत्तीमुक्त करण्यासाठी मोहीम राबवली जात आहे. सुरुवातीच्या सर्वेक्षणात शहरात तब्बल ६,५०० भिकारी आढळले होते. त्यापैकी ४,५०० जणांचे समुपदेशन करून त्यांना या कामापासून परावृत्त करण्यात आले आहे, तर १६०० जणांना सेवाधाम आश्रमात पाठवण्यात आले आहे. मांगीलालसारख्या व्यावसायिक भिका-यांमुळे गरजू आणि ख-या भिका-यांकडे पाहण्याची समाजाची दृष्टी मलिन होत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. अशा टोळ्यांवर आता कडक कारवाई केली जाणार आहे.

WhatsApp Image 2024-10-23 at 8.06.44 PM

WhatsApp Image 2024-09-25 at 8.09.53 PM(1)

IMG-20251117-WA0399

Tags:

About The Author

Maharashtra Janshakti News Picture

Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

उच्च शिक्षणातील जातीभेदाविरुद्ध छत्रपती संभाजीनगरात एल्गार :  राजकुमार बडोले फाउंडेशन आणि लॉर्ड बुद्धा टीव्ही यांच्या संयुक्त पुढाकारातून ‘यूजीसी अधिनियम 2026’वर महाचर्चा चे आयोजन उच्च शिक्षणातील जातीभेदाविरुद्ध छत्रपती संभाजीनगरात एल्गार : राजकुमार बडोले फाउंडेशन आणि लॉर्ड बुद्धा टीव्ही यांच्या संयुक्त पुढाकारातून ‘यूजीसी अधिनियम 2026’वर महाचर्चा चे आयोजन
    छत्रपती संभाजीनगर : देशभरातील विद्यापीठे आणि उच्च शिक्षण संस्थांमध्ये अनुसूचित जाती, जमाती आणि ओबीसी विद्यार्थ्यांवर होणाऱ्या उघड व छुप्या
जितेंद्र लक्ष्मणराव बोडखे : एका चारित्र्य संपन्न शिक्षकाची सेवानिवृत्ती
मराठवाडा मूर्तीने समृद्ध परिपूर्ण असणारा भूप्रदेश -डॉ. माया पाटील 
प्रा. डॉ. किशोर वाघ यांना “राष्ट्रसंत गाडगेबाबा राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार – 2026” प्रदान
संत साहित्याच्या केंद्रस्थानी मानवतावाद -डॉ. विजयकुमार फड 
जमाते इस्लामी हिंद कडून जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा ढोरेगावला मौल्यवान पुस्तकांची भेट....
विवेकानंद शिक्षण संस्था संचलित मराठा हायस्कूल, चौराहा येथे थोर समाजसुधारक संत गाडगे महाराज यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी
Join Us on Whatsapp