डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात 'विभाजन एक विभिषिका स्मृतिदिन' व्याख्यानाचे आयोजन.
छत्रपती संभाजीनगर :- (प्रा. शिवाजी गायकवाड)
पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगष्ट २०२१ रोजी लाल किल्ल्यावरुन आपल्या भाषणात १४ ऑगष्ट या दिवशी 'विभाजन एक विभिषिका स्मृतिदिन' म्हणून पाळण्याबाबत घोषणा केली होती. कोट्यावधी लोकांनी आपल्या घरादारांचा त्याग केला होता.या दिवशी लोकांनी दिलेल्या बलिदानाची व विभाजनाच्या वेळी झालेल्या वेदना, त्रास व दुःख यांचे स्मरण करुन सदर दिवसाच्या इतिहासाची यूवकांना जाणीव व्हावी म्हणून दरवर्षी १४ ऑगस्ट हा दिवस विभाजनः एक विभिषिका स्मृतिदिन म्हणून पाळण्यात येईल असे आवाहन केले आहे. याचे औचित्य साधून दि.२० ऑगस्ट २०२५ रोजी. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर,इतिहास आणि प्राचीन भारतीय संस्कृती विभाग यांच्या वतीने" विभाजन : एक विभिषिका "स्मृतिदिन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर व्याख्यान: एम.ए. प्रथमवर्ष राज्यशास्त्र विभागाचा हॉल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर. येथे दि. २०/०८/२०२५ वेळ : दु. ३:३० वाजता होणार आहे .तरी या व्याख्यानाचा लाभ इतिहास प्रेमी व युवकांनी घ्यावा असे आवाहन इतिहास विभागाच्या वतीने करण्यात आले असून यात प्रमुख व्याख्याते म्हणून भरत उत्तमराव आमदापूरे (उदगीर जि. लातूर) हे व्याख्यानाचे पुष्प गुंफणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रा.डॉ. व्यंकटेश लांब,व्यवस्थापन परिषद सदस्य, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे तर कार्यक्रमांच्या अध्यक्ष स्थानी प्रा. डॉ. वाल्मिक सरवदे प्र-कुलगुरू,डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर हे राहणार आहे. तरी या व्याख्यानाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन प्रा. डॉ. गीतांजली बोराडे विभाग प्रमुख, इतिहास विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर,प्रा. डॉ. प्रशांत अमृतकर कुलसचिव,डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर. यांनी केले आहे. तरी याची नोंद इतिहास प्रेमी युवक व विद्यार्थी यांनी घ्यावी असे कळवले आहे.
About The Author

Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.
Comment List