AEDP च्या विद्यार्थ्यांनी अप्रेंटिसशिपद्वारे आपले भविष्य घडवावे : सहाय्यक संचालक निखिल गांगडे

AEDP च्या विद्यार्थ्यांनी अप्रेंटिसशिपद्वारे आपले भविष्य घडवावे : सहाय्यक संचालक निखिल गांगडे

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) :-   मौलाना आझाद कॉलेज, रोझा बाग आणि बोर्ड ऑफ अप्रेंटिसशिप ट्रेनिंग यांच्यामध्ये बीए सायकॉलॉजी आणि बीएससी इंडस्ट्रियल केमिस्ट्रीच्या विद्यार्थ्यांसाठी अप्रेंटिसशिप ट्रेनिंग संदर्भात सामंजस्य करार (MOU) करण्यात आला. यावेळी कॉलेजचे प्राचार्य डॉ. मझहर फारुकी आणि बोर्ड ऑफ अप्रेंटिसशिपचे सहाय्यक संचालक निखिल गांगडे उपस्थित होते.

कार्यक्रमात उद्योग क्षेत्राकडून डॉ. फुरकान दिवान, सिनियर सायंटिस्ट वखाड लिमिटेड, सतीश वानखेडे, प्रो. क्रोम्स अॅनालिटिकल इन्स्टिट्यूट तसेच सायकॉलॉजी विभागाकडून डॉ. फैसल खलजी, सना खलजी, शुभम डोंगरे (हेडगेवार हॉस्पिटल), शेख एजाज सिद्दीकी, डॉ. झैनब खान आणि हुजैफा खान उपस्थित होते. याशिवाय AEDP कोर्सेस करणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि महाविद्यालयाचा अध्यापकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

कार्यक्रमाची सुरुवात मौलाना वकार यांच्या कुरआन पठणाने झाली. त्यानंतर मान्यवरांचे पुस्तक भेट देऊन स्वागत करण्यात आले.

प्रास्ताविक भाषणात प्राचार्य डॉ. मझहर फारुकी यांनी कार्यक्रमाचे उद्देश स्पष्ट केले. त्यांनी अप्रेंटिसशिप बोर्डाच्या सहभागामुळे विद्यार्थ्यांना होणाऱ्या फायद्यांवर प्रकाश टाकला तसेच नवीन शैक्षणिक धोरण (NEP) आणि UGC च्या मार्गदर्शक सूचनांनुसार या कोर्सेसचे महत्त्व अधोरेखित केले.

डॉ. अझहर पटेल यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. यावेळी सहाय्यक संचालक निखिल गांगडे यांनी अप्रेंटिसशिपसाठी पात्रता, त्याचे फायदे आणि अंतिम वर्षात विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या आर्थिक सहाय्याबाबत (स्टायपेंड) सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितले की, सध्याच्या काळात उद्योग आणि शैक्षणिक संस्थांमधील दरी अशा प्रकारच्या कोर्सेसद्वारे भरून काढता येऊ शकते. तसेच भारत सरकारने उच्च शिक्षण व्यवस्थेमध्ये उद्योगांच्या गरजा लक्षात घेऊन प्रत्येक विद्यापीठाला AEDP कोर्सेस सुरू करण्यासाठी प्रोत्साहन दिले असल्याचेही त्यांनी सांगितले.

कार्यक्रमादरम्यान प्रश्नोत्तरांचे विशेष सत्र आयोजित करण्यात आले होते, ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी विविध प्रश्न विचारले. कार्यशाळेत सुमारे वीस विविध उद्योगांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते, तर AEDP कोर्सेसमध्ये प्रवेश घेतलेल्या सुमारे 20 विद्यार्थी-विद्यार्थिनी देखील उपस्थित होत्या.

शेवटी IQAC समन्वयक प्राध्यापक जे. डी. शेख यांनी आभार प्रदर्शन केले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. समरीन फारुकी यांनी केले.

IMG-20230723-WA0310

आपली शाळा, महविद्यालय,संस्था व संघटना यांच्या बातम्या, फोटो 7588005002 या नंबर वर व्हॉट्स ॲप वर पाठवा....कथा,कविता,पुस्तक परीक्षण, वैचारिक लेखन देखील उपरोक्त नंबर पाठवावे

WhatsApp Image 2024-09-25 at 8.09.53 PM

Tags:

About The Author

Maharashtra Janshakti News Picture

Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

AEDP च्या विद्यार्थ्यांनी अप्रेंटिसशिपद्वारे आपले भविष्य घडवावे : सहाय्यक संचालक निखिल गांगडे AEDP च्या विद्यार्थ्यांनी अप्रेंटिसशिपद्वारे आपले भविष्य घडवावे : सहाय्यक संचालक निखिल गांगडे
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) :-   मौलाना आझाद कॉलेज, रोझा बाग आणि बोर्ड ऑफ अप्रेंटिसशिप ट्रेनिंग यांच्यामध्ये बीए सायकॉलॉजी आणि बीएससी इंडस्ट्रियल...
शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांनी अखेर शिक्षकांना दिला न्याय. मराठवाडा शिक्षक संघाच्या उपोषणाला यश
गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न  डॉ. सौ. इंदिराबाई भास्करराव पाठक महाविद्यालयाचा यशस्वी गौरव सोहळा
मुजोर संस्था सचिव, अध्यक्ष, व शाळा मुख्याध्यापक यांना शिक्षणाधिकारी यांचा अभय ! मराठवाडा शिक्षक संघाच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषण सुरू
योग हेच सुखी आणि निरोगी जीवनाचे सूत्र आहे. - महामहीम राज्यपाल हरिभाऊ बागडे
सलमान खानच्या हिरोईनने आधीच केलं होतं थलापतिच्या विजयाचं भाकित, थेट VIDEO शेअर करत दिला पुरावा
राज्यातील शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा ; सर्व शाळांना ३१ मे २०२६ पर्यंत रिक्त जागांवर शिक्षक भरती करण्याचे आदेश
Join Us on Whatsapp