गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न  डॉ. सौ. इंदिराबाई भास्करराव पाठक महाविद्यालयाचा यशस्वी गौरव सोहळा

गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न   डॉ. सौ. इंदिराबाई भास्करराव पाठक महाविद्यालयाचा यशस्वी गौरव सोहळा

छत्रपती संभाजीनगर :-  डॉ. सौ. इंदिराबाई भास्करराव पाठक महाविद्यालयात इयत्ता बारावी (HSC) परीक्षेत उज्ज्वल यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या फेब्रुवारी–मार्च 2026 च्या परीक्षेत महाविद्यालयाने उल्लेखनीय यशाची परंपरा कायम राखत विज्ञान शाखेचा 93%, कला शाखेचा 67%, वाणिज्य शाखेचा 64% तसेच एच.एस.व्ही.सी. शाखेचा 87% असा समाधानकारक निकाल नोंदवला.

या निमित्ताने आयोजित सत्कार समारंभात विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शिला जिरे व प्रा. त्रिपती वरपडे यांनी केले. प्रा. रवींद्र परभणे व प्रा. डॉ. अन्विता अग्रवाल यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अध्यक्षीय समारोप प्राचार्य डॉ. सुनिता बाजपाई यांनी केला, तर आभार प्रा. माधुरी भावसार यांनी मानले.

महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थी पुढीलप्रमाणे आहेत—कला शाखेतून कनका देशपांडे (87.66%), ईशानी कुलकर्णी (85.17%) व सोनिया हाजोंग (70.66%) यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवले. वाणिज्य शाखेतून यश तोतला (95%), देवश्री लोटांगणे (94.33%), मयुरी सूर्यवंशी (93.16%) व मयुरी फटांगडे (90%) यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय व चतुर्थ क्रमांक पटकावला. विज्ञान शाखेतून शार्दुल जोशी (77.34%), शरयू मुधळ वाडकर (73.50%) व सायली यादव (67.83%) यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला. तसेच एच.एस.व्ही.सी. शाखेतून गोकर्ण नालटकर (71.67%), रूपाली कांबळे (70%) व दिशा आव्हाड (68.33%) यांनी विशेष प्राविण्य मिळवले.

संस्कृत विषयात कनका देशपांडे, देवश्री लोटांगणे, सांची पाटणी व मयुरी फटांगडे तसेच आय.टी. याविषयात वाणिज्य - श्रेयश शैलेश टोटला, विज्ञान - सुदर्शन सुनिल वैराळे, ओसीएम याविषयात मयुरी विष्णू सूर्यवंशी, निकीता मकरंद वानखेडे, एसपी याविषयात देवश्री राजेंद्र लोटांगणे श्रेयश शैलेश टोटला या विद्यार्थ्यांनी 100 पैकी 100 गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले.

या प्रसंगी प्राचार्य व शिक्षकवृंदांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनी व पालकांनी मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयातील गुणवत्तापूर्ण शिक्षण व सुरक्षित वातावरणाबद्दल समाधान व्यक्त केले.

IMG-20260502-WA0020

WhatsApp Image 2024-09-25 at 8.09.53 PM(1)

आपली शाळा, महविद्यालय,संस्था व संघटना यांच्या बातम्या, फोटो 7588005002 या नंबर वर व्हॉट्स ॲप वर पाठवा....कथा,कविता,पुस्तक परीक्षण, वैचारिक लेखन देखील उपरोक्त नंबर पाठवावे

WhatsApp Image 2024-10-23 at 8.06.44 PM

Tags:

About The Author

Maharashtra Janshakti News Picture

Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

AEDP च्या विद्यार्थ्यांनी अप्रेंटिसशिपद्वारे आपले भविष्य घडवावे : सहाय्यक संचालक निखिल गांगडे AEDP च्या विद्यार्थ्यांनी अप्रेंटिसशिपद्वारे आपले भविष्य घडवावे : सहाय्यक संचालक निखिल गांगडे
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) :-   मौलाना आझाद कॉलेज, रोझा बाग आणि बोर्ड ऑफ अप्रेंटिसशिप ट्रेनिंग यांच्यामध्ये बीए सायकॉलॉजी आणि बीएससी इंडस्ट्रियल...
शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांनी अखेर शिक्षकांना दिला न्याय. मराठवाडा शिक्षक संघाच्या उपोषणाला यश
गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न  डॉ. सौ. इंदिराबाई भास्करराव पाठक महाविद्यालयाचा यशस्वी गौरव सोहळा
मुजोर संस्था सचिव, अध्यक्ष, व शाळा मुख्याध्यापक यांना शिक्षणाधिकारी यांचा अभय ! मराठवाडा शिक्षक संघाच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषण सुरू
योग हेच सुखी आणि निरोगी जीवनाचे सूत्र आहे. - महामहीम राज्यपाल हरिभाऊ बागडे
सलमान खानच्या हिरोईनने आधीच केलं होतं थलापतिच्या विजयाचं भाकित, थेट VIDEO शेअर करत दिला पुरावा
राज्यातील शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा ; सर्व शाळांना ३१ मे २०२६ पर्यंत रिक्त जागांवर शिक्षक भरती करण्याचे आदेश
Join Us on Whatsapp