मुजोर संस्था सचिव, अध्यक्ष, व शाळा मुख्याध्यापक यांना शिक्षणाधिकारी यांचा अभय ! मराठवाडा शिक्षक संघाच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषण सुरू

मुजोर संस्था सचिव, अध्यक्ष, व शाळा मुख्याध्यापक यांना शिक्षणाधिकारी यांचा अभय !     मराठवाडा शिक्षक संघाच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषण सुरू

 

छत्रपती संभाजीनगर :-  मुर्डेश्वर शिक्षण संस्था संचालित शांताई प्राथमिक विद्यालय या शाळेतील शिक्षकांची संस्थाचालक आणि मुख्याध्यापकांकडून शिक्षकांची आर्थिक पिळवणूक आणि शासनाची आर्थिक लूट होत असल्याने याच शाळेतील सहशिक्षक श्री रावसाहेब तुकाराम बोरसे, श्री रवींद्र दामोदर मगर, श्री रामेश्वर देविदास गोराडे, श्री अजित शेषराव जाधव, श्री सागर संजीव सूर्यवंशी, श्री संभाजी हनुमंता जाधव, श्री सचिन नारायण मुसळे हे मराठवाडा शिक्षक संघाच्या भाई चंद्रकांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आज दिनांक ०५ मे २०२६ वार मंगळवार रोजी जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी प्राथमिक कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. शाळेचे मुख्याध्यापक संदिप लक्ष्मण काजळे हे आहेत. संस्था सचिव लक्ष्मण ओंकार काजळे व अध्यक्षा श्रीमती संगीता लक्ष्मण काजळे हे शासनाची आर्थिक लूट व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याविषयी खेळत आहेत यात प्रशासन देखील यांना मदतच करीत आहेत, असा आरोप मराठवाडा शिक्षक संघाने केलेला आहे 

शाळेतील मुख्याध्यापकांनी नियमबाह्यरीत्या तुकडी वर्गाचा वाढीव टप्पा पगार मूळ वर्गाला दिलेला आहे. तो वाढीव टप्पा शासन निर्णयानुसार तुकडी वर्गांच्या शिक्षकांच्या पगारी खात्यावर जमा करण्यात यावा.

सेवा पुस्तकाची दुय्यम प्रत अद्यावत करून तात्काळ शिक्षकांना देण्यात यावी. शाळेतील ज्या शिक्षकांनी बारा वर्षाचा कालावधी पूर्ण केलेला आहे व वरिष्ठ वेतन श्रेणीचे प्रशिक्षण पूर्ण केलेले आहे अशा शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी लागू करण्यात यावी. शाळेत रुजू करून घेत असताना शाळेतील मुख्याध्यापक, संस्था सचिव व अध्यक्षा यांनी सर्व कर्मचाऱ्यांकडून दहा कोऱ्या कागदांवर स्वाक्षरी करून घेतलेल्या आहेत. तसेच शाळेतील सर्व शिक्षकांना धमकावून स्वाक्षरी सह राजीनामा व काही आक्षेपार्ह मुद्दे लिहून घेऊन त्यावर दिनांक नसलेले १५ कागदपत्रे तात्काळ देण्यात यावेत‌. शाळेतील मूळ वर्गावरील शिक्षक व तुकडी वर्गावरील शिक्षक यांना समान कामे वाटप करण्यात यावी. 

या प्रमुख मागणीसाठी मराठवाडा शिक्षक संघाचे महानगर सचिव नवनाथ मंत्री अशोक ढमढेरे, विनोद केनेकर, कृष्णा गोंडे, बाळू पवार, विलास चव्हाण, डॉ. पद्माकर पगार, सोनाली गव्हाणे, स्वाती बोंडे, रेखा साकळे, अरुणा चौधरी, सविता हिंगे, शितल कवडे संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी या आमरण उपोषणाला पाठिंबा दिला आहे.

IMG-20260502-WA0020

आपली शाळा, महविद्यालय,संस्था व संघटना यांच्या बातम्या, फोटो 7588005002 या नंबर वर व्हॉट्स ॲप वर पाठवा....कथा,कविता,पुस्तक परीक्षण, वैचारिक लेखन देखील उपरोक्त नंबर पाठवावे

WhatsApp Image 2024-09-25 at 8.09.53 PM(1)

WhatsApp Image 2024-09-25 at 8.09.53 PM(1)

WhatsApp Image 2024-09-25 at 8.09.53 PM

IMG-20251117-WA0399

Tags:

About The Author

Maharashtra Janshakti News Picture

Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

AEDP च्या विद्यार्थ्यांनी अप्रेंटिसशिपद्वारे आपले भविष्य घडवावे : सहाय्यक संचालक निखिल गांगडे AEDP च्या विद्यार्थ्यांनी अप्रेंटिसशिपद्वारे आपले भविष्य घडवावे : सहाय्यक संचालक निखिल गांगडे
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) :-   मौलाना आझाद कॉलेज, रोझा बाग आणि बोर्ड ऑफ अप्रेंटिसशिप ट्रेनिंग यांच्यामध्ये बीए सायकॉलॉजी आणि बीएससी इंडस्ट्रियल...
शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांनी अखेर शिक्षकांना दिला न्याय. मराठवाडा शिक्षक संघाच्या उपोषणाला यश
गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न  डॉ. सौ. इंदिराबाई भास्करराव पाठक महाविद्यालयाचा यशस्वी गौरव सोहळा
मुजोर संस्था सचिव, अध्यक्ष, व शाळा मुख्याध्यापक यांना शिक्षणाधिकारी यांचा अभय ! मराठवाडा शिक्षक संघाच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषण सुरू
योग हेच सुखी आणि निरोगी जीवनाचे सूत्र आहे. - महामहीम राज्यपाल हरिभाऊ बागडे
सलमान खानच्या हिरोईनने आधीच केलं होतं थलापतिच्या विजयाचं भाकित, थेट VIDEO शेअर करत दिला पुरावा
राज्यातील शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा ; सर्व शाळांना ३१ मे २०२६ पर्यंत रिक्त जागांवर शिक्षक भरती करण्याचे आदेश
Join Us on Whatsapp