सलमान खानच्या हिरोईनने आधीच केलं होतं थलापतिच्या विजयाचं भाकित, थेट VIDEO शेअर करत दिला पुरावा
मुंबई: तामिळनाडूच्या विधानसभा निवडणुकीत थलापति विजयने ऐतिहासिक विजयाची नोंद केली आहे. पहिल्याच प्रयत्नात पेरंबूर आणि तिरुचिरापल्ली पूर्व या दोन्ही मतदारसंघांत त्याने आपलं वर्चस्व सिद्ध केलं. पण या विजयाची खात्री एका अभिनेत्रीला खूप आधीपासून होती. नुकतंच या अभिनेत्रीने एक असा व्हिडिओ शेअर केला आहे, ज्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय. विशेष म्हणजे, या साऊथच्या स्टार अभिनेत्रीने सलमान खान, शाहिद कपूर, रणवीर सिंग, ऋतिक रोशन यांसारख्या दिग्गजांसोबत काम केलं आहे.थलापति विजयच्या विजयाचं भाकित करणारी ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून पूजा हेगडे आहे. पूजा हेगडे थलापति विजयच्या 'जन नायक' या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहे. तामिळनाडू विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता पूजाने या फिल्मच्या सेटवरील एक बीटीएस व्हिडीओ शेअर केला आहे.पूजा हेगडेने आधीच केलेलं भाकितया व्हिडिओमध्ये पूजा एका बोर्डकडे बोट दाखवते, ज्यावर लिहिलं असतं, "निवडणूक कोण जिंकणार?" (Who wins the elections?). या प्रश्नाचं उत्तर देताना पूजा काहीच बोलत नाही, ती थेट शेजारी उभ्या असलेल्या विजयकडे बघून डोळा मिचकावते. पूजाचा हा रोखठोक अंदाज पाहून थलापति विजय चक्क लाजून लाल झाला. यावेळी या सुपरस्टारने लाजेपोटी दोन्ही हातांनी चेहरा झाकून घेतला आणि तो तिथून हसत निघून गेला. विजयचा हा निरागस आणि लाजाळू अवतार पाहून त्याचे चाहते आता वेडे झाले आहेत. मी आधीच म्हटलं होतं ना!" - पूजाची पोस्ट व्हायरलहा व्हिडिओ शेअर करताना पूजाने लिहिलंय, "बहुतेक मी हे भाकीत आधीच केलं होतं! स्वप्न सत्यात उतरताना पाहून खूप आनंद होतोय, अभिनंदन विजय सर!" इतकंच नाही तर काल निकाल जाहीर झाल्यानंतर तिने विजयसोबतचा एक फोटो शेअर करत लिहिलं, "अभिनंदन विजय सर, ही 'थलापति कचेरी' आता मोठी आणि मोठीच होत जाणार आहे. आता फक्त पुढे आणि वरच जायचंय. इट्स पार्टी टाईम 'जन नायक' चा वाद आता मिटणार विजय आणि पूजा हेगडे ही जोडी २०२२ च्या 'बीस्ट' नंतर पुन्हा एकदा 'जन नायक' मधून मोठ्या पडद्यावर परतत आहे. सेन्सॉर सर्टिफिकेट आणि इतर कारणांमुळे हा सिनेमा गेल्या अनेक दिवसांपासून रखडला होता. पण आता विजय तामिळनाडूचे भावी मुख्यमंत्री होणार असल्याने, या राजकीय बदलाचा फायदा चित्रपटाला मिळेल आणि हा बहुप्रतिक्षित सिनेमा लवकरच प्रदर्शित होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. एच. विनोद यांच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेल्या या चित्रपटात केवळ विजय आणि पूजाच नाहीत, तर ममिता बैजू, बॉबी देओल, गौतम वासुदेव मेनन, प्रियामणी आणि प्रकाश राज यांसारखी तगडी स्टारकास्ट आहे.
.jpeg)
आपली शाळा, महविद्यालय,संस्था व संघटना यांच्या बातम्या, फोटो 7588005002 या नंबर वर व्हॉट्स ॲप वर पाठवा....कथा,कविता,पुस्तक परीक्षण, वैचारिक लेखन देखील उपरोक्त नंबर पाठवावे

About The Author
Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.


Comment List