कालीचरण महाराजांचा 'डिलिव्हरी जिहाद'चा आरोप, डॉक्टरांच्या हेतूवर शंका, हिंदू महिलांच्याच सिजेरियन प्रसूती का होतात : वाद निर्माण होण्याची शक्यता

कालीचरण महाराजांचा 'डिलिव्हरी जिहाद'चा आरोप, डॉक्टरांच्या हेतूवर शंका, हिंदू महिलांच्याच सिजेरियन प्रसूती का होतात : वाद निर्माण होण्याची शक्यता

आपल्या आक्रमक आणि वादग्रस्त वक्तव्यांमुळे सातत्याने चर्चेत राहणारे कालीचरण महाराज यांनी आता डॉक्टरांवर गंभीर आरोप केले आहेत. "देशात 'डिलिव्हरी जिहाद' सुरू असून यामध्ये हिंदू डॉक्टरच आघाडीवर आहेत," असा खळबळजनक दावा त्यांनी केला आहे. हिंदू महिलांच्या प्रसूती दरम्यान सिझेरियन शस्त्रक्रियांचे वाढते प्रमाण हे डॉक्टरांनी पैशांसाठी रचलेले एक मोठे षडयंत्र असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

पुण्यातील दौंड येथे आयोजित 'हिंदू विराट सभे'त बोलताना कालीचरण महाराज यांनी वैद्यकीय क्षेत्रातील प्रसूती प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. "हिंदू महिलांच्या पहिल्या प्रसूतीवेळी डॉक्टर मुद्दाम सिझेरियनचा मार्ग अवलंबतात. हिंदू बालकांच्याच गळ्यात नाळ कशी अडकते? हिंदूंचीच मुले आडवी कशी जन्माला येतात? केवळ हिंदू महिलांच्याच बाबतीत सिझेरियनचे प्रमाण जास्त का आणि मुस्लिम महिलांच्या बाबतीत ते कमी का?" असा सवाल कालीचरण महाराज यांनी उपस्थित केला.

डॉक्टरांवर पैशांसाठी षडयंत्राचा आरोप

कालीचरण महाराजांनी या प्रक्रियेला 'डिलिव्हरी जिहाद' असे नाव दिले असून यात हिंदू डॉक्टरांचा मोठा सहभाग असल्याचे म्हटले आहे. "जास्तीत जास्त पैसा कमवण्यासाठी डॉक्टरांकडून हे षडयंत्र रचले जात आहे. या माध्यमातून हिंदू समाजाला आर्थिक आणि शारीरिकदृष्ट्या कमकुवत करण्याचा प्रयत्न केला जात आहे," असा गंभीर आरोप त्यांनी आपल्या भाषणातून केला.

वैद्यकीय क्षेत्रात संताप उमटण्याची शक्यता

कालीचरण महाराजांनी कोणत्याही शास्त्रीय आधाराशिवाय थेट डॉक्टरांना आणि त्यांच्या कार्यपद्धतीला 'जिहाद'शी जोडल्यामुळे वैद्यकीय क्षेत्रातून तीव्र संताप व्यक्त केला जाण्याची शक्यता आहे. यापूर्वीही त्यांनी विविध विषयांवरून वाद ओढवून घेतला असून, आता थेट आरोग्य व्यवस्थेवरच आरोप केल्याने नवा कायदेशीर पेच निर्माण होऊ शकतो.

IMG-20260502-WA0020

आपली शाळा, महविद्यालय,संस्था व संघटना यांच्या बातम्या, फोटो 7588005002 या नंबर वर व्हॉट्स ॲप वर पाठवा....कथा,कविता,पुस्तक परीक्षण, वैचारिक लेखन देखील उपरोक्त नंबर पाठवावे

WhatsApp Image 2024-10-23 at 8.06.44 PM

IMG-20251117-WA0399

Tags:

About The Author

Maharashtra Janshakti News Picture

Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न   डॉ. सौ. इंदिराबाई भास्करराव पाठक महाविद्यालयाचा यशस्वी गौरव सोहळा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न  डॉ. सौ. इंदिराबाई भास्करराव पाठक महाविद्यालयाचा यशस्वी गौरव सोहळा
छत्रपती संभाजीनगर :-  डॉ. सौ. इंदिराबाई भास्करराव पाठक महाविद्यालयात इयत्ता बारावी (HSC) परीक्षेत उज्ज्वल यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार...
मुजोर संस्था सचिव, अध्यक्ष, व शाळा मुख्याध्यापक यांना शिक्षणाधिकारी यांचा अभय ! मराठवाडा शिक्षक संघाच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषण सुरू
योग हेच सुखी आणि निरोगी जीवनाचे सूत्र आहे. - महामहीम राज्यपाल हरिभाऊ बागडे
सलमान खानच्या हिरोईनने आधीच केलं होतं थलापतिच्या विजयाचं भाकित, थेट VIDEO शेअर करत दिला पुरावा
राज्यातील शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा ; सर्व शाळांना ३१ मे २०२६ पर्यंत रिक्त जागांवर शिक्षक भरती करण्याचे आदेश
राज्यस्तरीय चित्र रंगभरण स्पर्धेत नाशिक मनपा शाळा क्र. ४९ ची उज्ज्वल कामगिरी; महाराष्ट्र दिनी सन्मान सोहळा
बद्रीनारायण बारवाले महाविद्यालयाची बारावी परीक्षेत यशाची परंपरा कायम; वाणिज्य शाखेचा निकाल १०० टक्के!
Join Us on Whatsapp