हुर्रे! बारावीचा निकाल लागला: वाचा कोणता विभाग पुढे गेला आणि कोणता मागे पडला , निकाल कसा पाहायचा या सर्व बाबतीत विस्तृत माहिती

हुर्रे! बारावीचा निकाल लागला: वाचा कोणता विभाग पुढे  गेला आणि कोणता मागे पडला , निकाल कसा पाहायचा या सर्व बाबतीत विस्तृत माहिती

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीचा निकाल जाहीर केला असून, यंदा राज्याचा एकूण निकाल 89.79 टक्के लागला आहे. विशेष म्हणजे, गेल्या पाच वर्षांतील हा निचांकी निकाल असून राज्याच्या निकालाचा टक्का पुन्हा एकदा घसरल्याचे पाहायला मिळत आहे. विभागात दरवर्षीप्रमाणे 94.14 टक्क्यांसह कोकण विभागाने आपले वर्चस्व कायम राखले आहे, तर कधीकाळी शैक्षणिक पॅटर्नसाठी ओळखल्या जाणाऱ्या लातूर विभागाचा निकाल 84.14 टक्के लागल्याने हा विभाग राज्यात सर्वात शेवटी ठरला आहे.

बारावीचा विभागनिहाय निकाल

1 कोकण 94.14 टक्के

2. पुणे 91.25 टक्के

3. अमरावती 90.92 टक्के

4 नाशिक 90.72 टक्के

5 मुंबई 90.08 टक्के

6 कोल्हापूर 89.97 टक्के

7 छत्रपती संभाजीनगर 88.68 टक्के

8 नागपूर 88.67 टक्के

9 लातूर 84.14 टक्के

इयत्ता बारावी निकालाची ठळक वैशिष्ट्ये

1. या परीक्षेस राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर क कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून विज्ञान, कला, वाणिज्य व व्यवसाय अभ्यासक्रम व आय. टी. आय. या शाखांसाठी एकूण 14,44,713 नियमित विद्याथ्र्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 14,33,058 विदयार्थी प्रविष्ट झाले असून त्यापैकी 12,86,843 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व उत्तीर्णतची टक्केवारी 89.79 आहे.

2. खाजगी विदयार्थी म्हणून नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या 37,559 एवढी असून त्यापैकी 36,941 विद्यार्थी प्रविष्ट झाले असून 29,634 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यांच्या उत्तीर्णतची टक्केवारी 80.21 आहे.

3. या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळांमधून सर्व शाखांमधून एकूण 50,876 पुनर्परिक्षार्थी विद्याथ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 50,346 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले. त्यापैकी 18,349 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी 36.44 आहे.

4. या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळांमधून सर्व शाखांमधून एकूण 8,446 दिव्यांग विद्याथ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 8,367 दिव्यांग वि‌द्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले. त्यापैकी 7,579 दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी 90.58 आहे.

5. इ.12 वी परीक्षेस नोंदणी केलेल्या पात्र दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रचलित पद्धतीने सवलतीचे गुण देण्याबाचत कार्यवाही करण्यात आलेली आहे.

6. सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थ्यांचा कोकण विभागाचा निकाल (94.14 %) सर्वाधिक असून सर्वांत कमी निकाल लातूर विभागाचा (84.14%) आहे.

7. सर्व विभागीय मंडळातून नियमित मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी 93.15 असून मुलांची उत्तीर्णतेची टक्केवारी 86.80% आहे. म्हणजेच मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा 6.35% ने जास्त आहे.

8. एकूण 153 विषयांपैकी 26 विषयांचा निकाल 100% आहे.

कुठे पाहायचा निकाल?

महाराष्ट्र बोर्डाचा इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांना आपला निकाल 'mahahsscboard.in' या अधिकृत वेबसाइटवर पाहता येईल. त्यासाठी वेबसाइटवरील "एचएससी परीक्षा निकाल 2026" या लिंकवर क्लिक करून आपला आसन क्रमांक आणि आईचे नाव अचूकपणे प्रविष्ट करावे लागेल. या सोप्या पायऱ्यांचे अनुसरण करून "निकाल पहा" या पर्यायावर क्लिक करताच विद्यार्थ्यांना त्यांचा स्कोअरकार्ड सहजपणे ऑनलाइन तपासता येईल.

कसा पाहायचा निकाल?

इयत्ता 12वीचा निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी mahahsscboard.in, mahresult.nic.in आणि hscresult.mkcl.org या अधिकृत संकेतस्थळांचा वापर करावा. निकाल जाहीर होताच लाखो विद्यार्थी एकाच वेळी लॉगिन करत असल्याने वेबसाईट मंदावण्याची शक्यता असते. अशा वेळी ब्राउझरचा कॅशे साफ करणे, एकाच वेळी विविध टॅबमध्ये वेगवेगळ्या वेबसाईट उघडून ठेवणे किंवा काही वेळाने पुन्हा प्रयत्न करणे सोयीचे ठरेल. निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी भविष्यातील संदर्भासाठी आपली गुणपत्रिका डाऊनलोड करून घ्यावी किंवा तिची प्रिंट काढून सुरक्षित ठेवावी.

WhatsApp Image 2024-10-23 at 8.06.44 PMWhatsApp Image 2024-09-25 at 8.09.53 PM(1)

Tags:

About The Author

Maharashtra Janshakti News Picture

Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न   डॉ. सौ. इंदिराबाई भास्करराव पाठक महाविद्यालयाचा यशस्वी गौरव सोहळा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न  डॉ. सौ. इंदिराबाई भास्करराव पाठक महाविद्यालयाचा यशस्वी गौरव सोहळा
छत्रपती संभाजीनगर :-  डॉ. सौ. इंदिराबाई भास्करराव पाठक महाविद्यालयात इयत्ता बारावी (HSC) परीक्षेत उज्ज्वल यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार...
मुजोर संस्था सचिव, अध्यक्ष, व शाळा मुख्याध्यापक यांना शिक्षणाधिकारी यांचा अभय ! मराठवाडा शिक्षक संघाच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषण सुरू
योग हेच सुखी आणि निरोगी जीवनाचे सूत्र आहे. - महामहीम राज्यपाल हरिभाऊ बागडे
सलमान खानच्या हिरोईनने आधीच केलं होतं थलापतिच्या विजयाचं भाकित, थेट VIDEO शेअर करत दिला पुरावा
राज्यातील शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा ; सर्व शाळांना ३१ मे २०२६ पर्यंत रिक्त जागांवर शिक्षक भरती करण्याचे आदेश
राज्यस्तरीय चित्र रंगभरण स्पर्धेत नाशिक मनपा शाळा क्र. ४९ ची उज्ज्वल कामगिरी; महाराष्ट्र दिनी सन्मान सोहळा
बद्रीनारायण बारवाले महाविद्यालयाची बारावी परीक्षेत यशाची परंपरा कायम; वाणिज्य शाखेचा निकाल १०० टक्के!
Join Us on Whatsapp