एकतर विजयी यात्रा, नाहीतर अंत्ययात्रा, मनोज जरांगे ठाम :आम्ही OBC सोबत जाणारच, सरकारकडून वेळकाढूपणा सुरू असल्याचा आणि फडणवीस सरड्या पेक्षा कमी नसल्याचा केला आरोप

एकतर विजयी यात्रा, नाहीतर अंत्ययात्रा, मनोज जरांगे ठाम :आम्ही OBC सोबत जाणारच, सरकारकडून वेळकाढूपणा सुरू असल्याचा आणि  फडणवीस सरड्या पेक्षा कमी नसल्याचा केला आरोप

सुप्रिया सुळे यांच्या गाडीवर हल्ला केल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आंदोलकांना खडसावले आहे. यावेळी बोलताना जरांगे यांनी म्हटले की सन्मान दिला नाही तर नेते आंदोलनस्थळी यायला घाबरतील. सन्मानाने येऊ द्या आणि सन्मानाने पाठवा, ही जबाबदारी तुमच्यावर आहे. यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी महायुती सरकार तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. एकतर विजयी यात्रा नाहीतर माझी अंत्ययात्रा निघेल, असेही यावेळी जरांगे म्हणाले.

राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतलेल्या बैठकीवर देखील मनोज जरांगे यांनी भाष्य केले, ते म्हणाले, सुप्रीम कोर्टाचा सरसकटला विरोध असण्याचे कारण नाही. पण कोर्टात अडचण असेल तर मराठा कुणबी ही उपजात आहे असे करा, सरसकट म्हणू नका. २०१२ च्या कायद्यानुसार मराठा आणि कुणबी पोटजात म्हणून घ्या सरसकट म्हणायची गरज नाही. सरकारला आता एकही कागदपत्र देणार नाही. कारण सरकारने १३ महिन्यांपूर्वी हैदराबाद गॅझेटकडून कागदपत्रे घेतले आहे. सातारा गॅझेट आहे तसेच मराठवाड्यातला मराठा हा कुणबी आहे हे सिद्ध झाले आहे. राज्य मागासवर्ग आयोगाकडून ते घेणे गरजेचे आहे, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

सरकारकडून वेळकाढूपणा सुरू

शिंदे समितीचे सगळ्यात महत्त्वाचे काम आहे नोंदी शोधणे, त्याचा अहवाल तयार करणे. त्याचे तीन खंड बनवले, सरकारला द्यावे. सरकारने हा अहवाल स्वीकारून कॅबिनेटसमोर ठेऊन ते पुढे स्वीकारावे. शिंदे समितीचा अहवाल स्वीकारला तर कोणीही अडवू शकणार नाही. पण सरकारकडून वेळकाढूपणा सुरू आहे. १३ महीने काय भजे तळले का? आता तुम्ही मजा बघा, पोरं कसे नीट करतात यांना. आमचे आता पुरेच येणार आहेत. एकदा जर आमचे धोतरं आले न ते कोणालाच गिनत नाही. आमचा मेन माल आला की बघा मग काय होते ते, असे म्हणत जरांगे यांनी इशारा दिला आहे.

आम्ही ओबीसीमध्ये जाणार म्हणजे जाणार

आम्हाला ओबीसी आरक्षणात जाण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही. आम्ही ओबीसीमध्ये जाणार म्हणजे जाणार, असे म्हणत मनोज जरांगे यांनी निर्धार बोलून दाखवला. तसेच मुख्यमंत्र्यांनी मला जेलमध्ये जरी टाकले तरी तिथे माझे उपोषण सुरू राहणार आहे. एकतर इथून विजयी होऊन जाणार नाहीतर माझी अंत्ययात्रा जाणार. शांततेत मोर्चे काढून अपमानच पडला. समाजाचा किती अंत पाहणार? शेवटी गरिबांच्या लेकरांच्या आयुष्याचा प्रश्न आहे.

फडणवीस यांची तुलना सरड्यासोबत

देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे महाराष्ट्र बिघडत जात असेल तर केंद्राने देखील विचार करणे गरजेचे आहे. तुम्हाला फक्त मुंबईचे बेट शिल्लक राहील, आजूबाजूला मराठे असणार आहेत आणि मी मेलोच तर महाराष्ट्र तर नाहीच पण मुंबई सुद्धा तुमचे राहणार नाही. फडणवीस म्हणाले होते की अपवादात्मक परिस्थितीत आरक्षण देता येत नाही, पण तेव्हा ते सत्तेत नव्हते. आता आजची परिस्थिती आरक्षण देण्याची आहे. सत्ता नसताना फडणवीस यांचे अंग वेगळे आहे, असे म्हणत मनोज जरांगे यांनी फडणवीस यांची तुलना सरड्यासोबत केली. देवेंद्र फडणवीस यांचे सरकार नव्हते तेव्हा ते म्हणाले धनगर आरक्षण देणार, नाही दिले. शेतकऱ्यांना म्हणाले होते कर्जमाफी करतो, नाही केली.

IMG-20240814-WA0257

IMG-20230723-WA0310

IMG-20240924-WA0354

Tags:

About The Author

Maharashtra Janshakti News Picture

Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

सरकार नरमले ; जरांगे जिंकले ! जरांगे पाटलांच्या जवळपास सर्व मागण्या मान्य , रात्री नऊ वाजेपर्यंत मुंबई खाली करण्याचे जरांगे पाटलांचे आश्वासन : महाराष्ट्रभरात मराठा समाजाचा जल्लोष सरकार नरमले ; जरांगे जिंकले ! जरांगे पाटलांच्या जवळपास सर्व मागण्या मान्य , रात्री नऊ वाजेपर्यंत मुंबई खाली करण्याचे जरांगे पाटलांचे आश्वासन : महाराष्ट्रभरात मराठा समाजाचा जल्लोष
मुंबई:मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आझाद मैदानावर मनोज जरांगे यांचे उपोषण आणि आंदोलनाला आज ऐतिहासिक यश मिळाले आहे. राज्य सरकारच्या मराठा उपसमितीने...
बाहेरून येणारे मराठा आंदोलक देशी दारूच्या बाटल्या आणत आहेत, गुणरत्न सदावर्तेंचा आरोप
भारताचा माजी कर्णधार, क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीनच्या गळ्यात पडणार मंत्रीपदाची माळ ? ; विधान परिषदेसाठी नामांकन
एकतर विजयी यात्रा, नाहीतर अंत्ययात्रा, मनोज जरांगे ठाम :आम्ही OBC सोबत जाणारच, सरकारकडून वेळकाढूपणा सुरू असल्याचा आणि फडणवीस सरड्या पेक्षा कमी नसल्याचा केला आरोप
तुम्ही गांधींना मारलं, तुकारामांना मारलं… आता जरांगेंनाही मारणार का ? राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्याचा भाजपवर अन् मुख्यमंत्र्यांवर घणाघात
मराठा आरक्षणाच्या संदर्भात 40 वर्षांच्या ब्रिटिशकालीन नोंदी कशा नाकारता येतील? पहिला नियोजन आयोग व शेड्युल्ड कास्ट कमिशननेही ते पुरावा म्हणून ग्राह्य धरले - विश्वास पाटील
चांगली माणसं देव का नेतो ? पवित्ररिस्ता फेम प्रिया मराठेच्या निधनानंतर प्राजक्ता माळी भावूक
Join Us on Whatsapp