मटणावरून वाद, रिसॉर्ट कर्मचाऱ्यांवर हल्ला; १५ जखमी, एकाची प्रकृती गंभीर

मटणावरून  वाद, रिसॉर्ट कर्मचाऱ्यांवर हल्ला; १५ जखमी, एकाची प्रकृती गंभीर

लोणावळ्यातील वाकसई परिसरात मटण संपल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका रिसॉर्ट कर्मचाऱ्याला गंभीर मारहाण करण्यात आली आहे. झेस्टिन हिल रिसॉर्टमध्ये जेवणासाठी आलेल्या १५ जणांच्या गटाने कर्मचाऱ्यांवर हल्ला केला. या हल्ल्यात एक कर्मचारी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. लोणावळा ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईहून आलेल्या १५ जणांच्या या गटाने २६ मार्च रोजी दुपारच्या सुमारास वाकसई येथील झेस्टिन हिल रिसॉर्टमध्ये मुक्काम केला होता. दुपारच्या जेवणासाठी त्यांनी मटणाची ऑर्डर दिली. मात्र, रिसॉर्टमध्ये मटण उपलब्ध नसल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितल्यावर गटातील काही सदस्यांनी संताप व्यक्त करत वाद घालण्यास सुरुवात केली. हा तोंडी वाद काही वेळातच हिंसक बनला.

रिसॉर्टच्या चालक साधना मोहन भोईर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, गटातील काही जणांनी अचानक आक्रमक होत त्यांच्यावर लाथाबुक्क्यांनी हल्ला केला. त्यांचे डोके प्लास्टिकच्या खुर्चीवर आपटण्यात आले. त्यानंतर आरोपींनी स्वयंपाकघरातील आचारी महेश, मदतनीस संदीप आणि नितीन यांनाही मारहाण केली.

हल्लेखोरांनी रिसॉर्टमधील कर्मचारी सौरभ गोरे यांनाही मारहाण केली. गोरे यांच्या पोटावर आणि कमरेवर गंभीर मार लागल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक बनली. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या तपासणीत त्यांच्या मूत्राशयाला गंभीर दुखापत झाल्याचे समोर आले आहे. सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती नाजूक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

घटनेनंतर रिसॉर्ट व्यवस्थापनाने लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी १५ आरोपींपैकी पाच जणांची ओळख पटवली आहे. यामध्ये मुलुंड येथील वैभव वैती, ठाण्यातील स्मित वेनी आणि राज नाईक, तसेच भावेश वाईंगणकर आणि ललित वैती यांचा समावेश आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू असून त्यांना लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.

या घटनेमुळे लोणावळा परिसरात खळबळ उडाली असून पर्यटनस्थळांवरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. किरकोळ कारणावरून एवढ्या मोठ्या प्रमाणात हिंसाचार घडणे ही चिंताजनक बाब असल्याचे स्थानिक नागरिकांचे मत आहे.

हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये एखादा पदार्थ उपलब्ध नसल्यास ग्राहकांनी संयम राखणे अपेक्षित असताना अशा प्रकारे कायदा हातात घेणे हे गंभीर गुन्हेगारीकडे झुकणारे कृत्य असल्याचेही मत व्यक्त केले जात आहे.पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून सर्व आरोपींना लवकरच अटक करून न्यायालयासमोर उभे केले जाईल, असे सांगण्यात आले आहे.

 

WhatsApp Image 2024-09-25 at 8.09.53 PMजाहिरात

आपली शाळा, महविद्यालय,संस्था व संघटना यांच्या बातम्या, फोटो 7588005002 या नंबर वर व्हॉट्स ॲप वर पाठवा....कथा,कविता,पुस्तक परीक्षण, वैचारिक लेखन देखील उपरोक्त नंबर पाठवावे

WhatsApp Image 2024-09-25 at 8.09.53 PM(1)

Tags:

About The Author

Maharashtra Janshakti News Picture

Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

 वैशाली श्याम शिरसाठ (माजी प्र- कुलगुरू श्याम सिरसाठ यांच्या पत्नी) यांचे दुःखद निधन वैशाली श्याम शिरसाठ (माजी प्र- कुलगुरू श्याम सिरसाठ यांच्या पत्नी) यांचे दुःखद निधन
छत्रपती संभाजीनगर:- श्रीमती वैशाली श्याम शिरसाठ ( डॉ शाम शिरसाठ प्राध्यापक डॉ. बा. आ. मराठवाडा विद्यापीठ यांच्या पत्नी) वय ४७...
गझलकार डॉ. शेख इक्बाल मिन्ने यांच्या मातोश्री दौलतबी मिन्ने यांचे निधन
पोलिसच बनले पोलिसांचे वैरी!:गुप्तधनाच्या तपासादरम्यान अकोला पोलिसांचा बुलढाणा पोलिसांवर हल्ला, गुन्हा दाखल
गाडीवरून आला, चाकू काढला अन् पेट्रोल पंपावरच प्रेयसीचा गळा चिरला; संभाजीनगर - जालना रोड वरील घटना, पालकांमध्ये खळबळ
छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य हे शोषणाविरुद्धचे मानवी मूल्य : प्रा. डॉ. उमेश बगाडे यांचे प्रतिपादन 'शिवराय का आठवावे?' : प्रा. डॉ. उमेश बगाडे यांनी उलगडले शिवरायांच्या स्वराज्याचे समाजशास्त्रीय पदर
मिनाक्षी पवार यांची जि.प. महिला बालकल्याण सभापती पदी निवड, कन्नड तालुक्यात आनंदाचे वातावरण; अनेकांनी केले अभिनंदन
मटणावरून वाद, रिसॉर्ट कर्मचाऱ्यांवर हल्ला; १५ जखमी, एकाची प्रकृती गंभीर
Join Us on Whatsapp